कुणाल खेमू, रणवीर शौरी, रसिका दुग्गल, गजराज राव यांच्या 'लूटकेस' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. हा चित्रपट आता १० एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Khabar toh pakki hai, milte hai hum #Lootcase dekhne 10th April 2020 in theaters near you! 😜 https://t.co/6dpxMPfqs7
— kunal kemmu (@kunalkemmu) November 26, 2019
कुणाल खेमू स्टारर 'लूटकेस' चित्रपटाची कथा एक मध्यम वर्गीय कुटुंबातील व्यक्तीवर आधारीत आहे. मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या कुणाल खेमूला एक पैशांनी भरलेली सुटकेस सापडते. या सुटकेसमुळे त्याच्या आयुष्यात समस्यांचा डोंगर उभा राहतो. हेच या चित्रपटातून मजेशीर रीत्या मांडण्यात आलं आहे. तो या सर्वांचा कसा सामना करतो? हे चित्रपटातून पाहता येईल.
अभिनेता जावेद जाफरींचा मुलगा मीजान कुणाल खेमूच्या आगामी 'लूटकेस' या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे. मंगळवारी या चित्रपटांविषयीची माहिती समोर आली आहे. मीजाननं 'मलाल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
लूटकेसच्या ट्रेलरला प्रेक्षकांसोबतच बॉलिवूड कलाकारांनी देखील पसंती दिली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक हटके संकल्पना केली आहे. चित्रपटाच्या नावाला अनुसरूनच या चित्रपटाची गाणी आणि पोस्टर आहे. चित्रपटातील गाणी आणि पोस्टरची प्रेरणा दुसऱ्या हिट चित्रपटांमधून घेतली आहेत.
चित्रपटात कुणाल खेमू सोबत गजराज राव, रसिका दुग्गल, रणवीर शौरी आणि विजय राज झळकणार आहेत. राजेश कृष्णन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर फॉक्स स्टार स्टुडिओ आणि सोडा फिल्म प्रॉडक्शन तर्फे याची निर्मिती केली गेली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात किती यशस्वी होतो हे १० एप्रिलला २०२० मध्येच कळेल.
हेही वाचा