Advertisement

सलमान खानचा 'दबंग ३' वादाच्या भोवऱ्यात

'दबंग ३' चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ या गाण्यावर हिंदू जनजागृती समितीनं आक्षेप घेतला आहे.

सलमान खानचा 'दबंग ३' वादाच्या भोवऱ्यात
SHARES

सलमान खानचा आगामी ‘दबंग ३’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ या गाण्यावर हिंदू जनजागृती समितीनं आक्षेप घेतला आहे.

प्रमाणपत्र न देण्याची मागणी

सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. या गाण्यात हिंदू साधू तसेच भगवान शिव, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप या समितीने केला आहे.


धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

हुड हुड दबंग’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. ‘या गाण्यात सलमानसोबत साधूंना नाचताना दाखवलं आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सलमाननं हिंदू साधूंचा अवमान केला आहे, तशा प्रकारे मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना नाचताना दाखवण्याचं धाडस दाखवेल का? असा प्रश्‍न हिंदू जनजागृती समितीचं महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केला आहे.



हेही वाचा

शाहरुखच्या आगामी चित्रपटाच्या 'कहानी'त अभिषेकची एन्ट्री

'या' कारणास्तव न्यायालयाचा गोविंदा आणि जॅकी श्रॉफला दंड


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा