Advertisement

'या' कारणास्तव न्यायालयाचा गोविंदा आणि जॅकी श्रॉफला दंड

अभिनव यांनी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत याप्रकरणी न्यायालयाकडे दाद मागितली. हे संपूर्ण प्रकरण गेली पाच वर्षे न्यायालयात सुरु होतं. अखेर न्यायालयानं सबळ पुराव्याच्या आधारावर अभिनयच्या बाजूनं निर्णय घेतला.

'या' कारणास्तव न्यायालयाचा गोविंदा आणि जॅकी श्रॉफला दंड
SHARES

प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगर इथल्या ग्राहक न्यायालयानं वेदनाक्षमक तेलाच्या खोट्या जाहिरातीसाठी हा दंड सुनावला आहे. तसंच हे तेल तयार करणाऱ्या कंपनीलाही दंड ठोठावण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय होतं?

२०१२ साली अभिनव अग्रवाल यांनी वृत्तपत्रात आलेली एक जाहिरात पाहून आपले ७० वर्षीय पिता बृजभूषण अग्रवाल यांच्यासाठी हर्बल तेल खरेदी केलं होतं. गुडघेदुखीसाठी खरेदी केलेल्या या तेलाची किंमत ३ हजार ६०० रुपये इतकी होती. “या तेलाचा नियमित वापर केल्यास केवळ १५ दिवसांत शरीरातील सर्व वेदना पळून जातील आणि जर वेदना कमी झाल्या नाहीत, तर १५ दिवसांत तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील,” असा दावा या तेलाच्या जाहिरातीत गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांनी केला होता

पण हा दावा फोल ठरला. बृजभूषण यांची गुडघेदुखी १५ दिवसांनंतरही कमी झाली नाही. त्यामुळे अभिनव यांनी याबाबत कंपनीकडे तक्रार करुन आपले पैसे परत करण्याची विनंती केली. परंतु कंपनीनं पैसे परत करण्यास नकार दिल्याची माहिती एका वेबसाईटनं दिली

ग्राहकाची न्यायालयात धाव

अभिनव यांनी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत याप्रकरणी न्यायालयाकडे दाद मागितली. हे संपूर्ण प्रकरण गेली पाच वर्षे न्यायालयात सुरु होतं. अखेर न्यायालयानं सबळ पुराव्याच्या आधारावर अभिनय यांच्या बाजूनं निर्णय देत तेल कंपनी, गोविंदा, जॅकी श्रॉफ, टेलीमार्ट शॉपिंग नेटवर्क प्राइवेट लिमिटेड कंपनी या चौघांनाही दोषी ठरवलं आणि त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. आता हे दौघेजण मिळून अभिनव यांना २० हजार रुपये परत करणार आहेत.



हेही वाचा

लग्नाच्या २१ वर्षानंतर अर्जुन रामपाल-मेहर यांचा घटस्फोट

जॉननं सोडला 'सरफरोश'चा सिक्वल, नव्या अभिनेत्याचा शोध सुरू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा