Advertisement

लग्नाच्या २१ वर्षानंतर अर्जुन रामपाल-मेहर यांचा घटस्फोट

वांद्रे इथल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये अर्जुन आणि मेहरनं घटस्फोटाचा अर्ज केला होता. आता न्यायालयानं त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजुर केला आहे.

लग्नाच्या २१ वर्षानंतर अर्जुन रामपाल-मेहर यांचा घटस्फोट
SHARES

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिका यांनी 21 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला आहे. आता कायदेशीररित्या दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. वांद्रे इथल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये अर्जुन आणि मेहरनं घटस्फोटाचा अर्ज केला होता. आता न्यायालयानं त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजुर केला आहे.

मुलींचा ताबा आईकडे

कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शैलजा सावंत यांनी विशेष विवाह कायद्याअंतर्गत अर्जुन आणि मेहरच्या घटस्फोटाचा अर्ज मंजुर केला आहे. कौटुंबिक न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार अर्जुनच्या दोन्ही मुली मायरा आणि माहिका यांचा ताबा आई मेहरकडे राहणार आहे.

२१ वर्षांनी मोडला संसार 

अर्जुन-मेहरनं मे २०१८ मध्ये अर्जुन आणि मेहर यांनी विभक्त होणार असल्याची घोषणा केली होती. दोघे म्हणाले होते, ‘सहजीवनाच्या २० वर्षांच्या सुंदर प्रवासानंतर आता आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. आता आम्ही वेगवेगळ्या मार्गानं जायचं ठरवलं आहे. पण आम्ही एकमेकांसोबत कायम राहू, एकमेकांच्या मदतीला नेहमीच धावून येऊ.


अर्जुनची गर्लफ्रेंड

अर्जुन सध्या साऊथ आफ्रिकन मॉडेल आणि अभिनेत्री गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत नात्यात आहे. अद्याप दोघांनी लग्न केलेले नाही. पण याचवर्षी जुलै महिन्यात गॅब्रिएलानं अर्जुनच्या मुलाला जन्म दिला. अर्जुन आणि गॅब्रिएलानं त्यांच्या मुलाचं नाव आरिक ठेवलं आहे.हेही वाचा

जॉननं सोडला 'सरफरोश'चा सिक्वल, नव्या अभिनेत्याचा शोध सुरू

'या' तारखेला प्रदर्शित होणार हिना खानचा पहिला चित्रपट


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा