शाहरुखच्या आगामी चित्रपटाच्या 'कहानी'त अभिषेकची एन्ट्री

'कहानी' चित्रपटाचा खलनायक आणि सीरियल किलर बॉब बिस्वासवर आधारित हा चित्रपट आहे. 'कहानी' चित्रपटात 'बॉब बिस्वास'ची भूमिका बंगाली अभिनेता शास्वत चॅटर्जीनं साकारली होती.

SHARE

गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब असलेला बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच कमबॅक करणार आहे. शाहरूख खान आणि अभिषेक बच्चन 'बॉब बिस्वास' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या 'कहानी' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे.

'कहानी' चित्रपटाचा खलनायक आणि सीरियल किलर बॉब बिस्वासवर आधारित हा चित्रपट आहे. 'कहानी' चित्रपटात 'बॉब बिस्वास'ची भूमिका बंगाली अभिनेता शास्वत चॅटर्जीनं साकारली होती. हे पात्र खूपच गाजलं होतं. बॉब बिस्वास हे तेच पात्र आहे जो कहानी चित्रपटात विद्या बाबजीला ट्रेनखाली ढकलून मारण्याचा प्रयत्न करतो.

'बॉब बिस्वास' चित्रपटाची निर्मिती शाहरूखची 'रेड चिलीज एन्टरटेन्मेंट' ही कंपनी करत आहे. रेड चिलीज या निर्मिती संस्थेनं केलेल्या ट्विटमध्येही 'नमोश्कार' असं बंगाली भाषेत लिहिलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोष यांची मुलगी दिया घोष करणार आहे. दिया पहिल्यांदाच एका चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचं शूटींग २०२० मध्ये सुरू होणार आहे. अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.


हेही वाचा

... म्हणून हिंदुस्तानी भाऊच्या बायकोनं केली पोलिसांकडे तक्रार

अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणावर येणार चित्रपट


संबंधित विषय
ताज्या बातम्या