• ... म्हणून हिंदुस्तानी भाऊच्या बायकोनं केली पोलिसांकडे तक्रार
SHARE

बिग बॉस १३ या शोमधील हिंदुस्तनी भाऊ या स्पर्धकाच्या बायकोनं पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यांची बायको अश्विनी फाटक सध्या हिंदुस्तानी भाऊला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे त्रस्त झाली आहे. याचं कारण आहे हिंदुस्तानी भाऊचे खोटे नातेवाईक

खोट्या नातेवाईकांपासून त्रस्त

बिग बॉसच्या घरातील हिंदुस्तनी भाऊ सध्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. सलमान खानकडून देखील त्याचं कौतुक करण्यात येत आहे. पण याचा अश्विनी फाटक यांना सहन करावा लागत आहे. भाऊच्या खोट्या नातेवाईकांमुळे त्याची बायको सध्या त्रस्त आहे. भाऊचे नातेवाईक म्हणून रोज नव्या लोकांची नावं समोर येत आहेत. यालाच कंटाळून अश्विनीनं खार पोलिसांकडे तक्रार केली.  


"अशा लोकांपासून सावध राहा"

खोट्या नातेवाईकांमुळेच २४ नोव्हेंबरला अश्विनीनं  पोलिसात तक्रार केली आहे. या तक्रारीत तिनं म्हटलंय की, "सोशल माडियावर अनेक व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. यामध्ये ते हिंदुस्तानी भाऊचे नातेवाई असल्याचं सांगत आहेत. पण आमच्या कुटुंबात माझी सासू, मुलगा, माझे आई-वडील आणि हिंदुस्तानी भाऊचा भाचा एवढेच लोक आहेत," असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. तसंच अनेक लोक स्वतःला हिंदुस्तानी भाऊचे काका किंवा भाऊ असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा तिनं दिला आहे. आमचे नातेवाईक असल्याचं सांगून काही फसवणूक झाल्यास आम्ही जबाबदार नाही, असंही तिनं स्पष्ट केलं आहे. हेही वाचा

अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणावर येणार चित्रपट

'या' कारणास्तव न्यायालयाचा गोविंदा आणि जॅकी श्रॉफला दंड


संबंधित विषय
ताज्या बातम्या