Advertisement

मराठमोळ्या स्पृहाचे वेबसिरीजच्या विश्वात पहिलं पाऊल

स्पृहा जोशीसोबत या वेबसिरीजमध्ये पनाग, जीशान अय्यूब, शरद केलकर, हर्ष छाया और सुशांत सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत. २० डिसेंबरपासून जी५ वर तुम्ही ही वेबसिरीज पाहू शकता

मराठमोळ्या स्पृहाचे वेबसिरीजच्या विश्वात पहिलं पाऊल
SHARES

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीनं वेब सिरीजच्या विश्वात पहिलं पाऊल ठेवलं आहे. रंगबाज फिरसे या वेब सिरीजमध्ये स्पृहा जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जी ५ वर तुम्ही रंगबाज फिरसे ही वेबसिरीज पाहू शकता.

स्पृहा जोशी रंगबाज फिरसेमध्ये जिमी शेरगिलची ऑन-स्क्रिन पत्नी रुक्मिणी अमरपाल सिंह या भूमिकेत पाहायला मिळेल. तिला माहित आहे की तिचा नवरा गँगस्टर कसा झाला? का झाला? त्याच्या आयुष्यात होणाऱ्या एक एक घटनेची ती साक्षिदार आहे. एका गँगस्टर सोबत लग्न करून देखील तिनं घराचं घरपण खूप चांगल्या पद्धतीनं जपलं आहे. 

स्पृहा आपल्या भूमिकेबद्दल म्हणाली की, "रंगबाज फिरसे या वेबसिरीजचा भाग असणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी फार आनंदी आहे. दिग्दर्शक पराग मेहता यांची मी खूप आभारी आहे. त्यांच्यामुळेच मला ही संधी मिळाली. माझ्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता. वेबसिरीज कधी एकदा प्रदर्शित होतेय असं झालंय. जी मराठीसोबत माझं जुनं नातं आहे. जी मराठीवर मी काही शो देखील केले आहेत आणि ते चांगले गाजले देखील. आता मी जी५ सोबत काम करत आहे. माझ्यासाठी हा एक मोठा सन्मान आहे."  

वेबसिरीजच्या नऊ भागांमध्ये दाखवण्यात आलं आहे की, एखादा व्यक्ती जन्मापासूनच अपराधी नसतो. परिस्थिती त्याला तसं बनण्यास भाग पाडते. स्पृहा जोशीसोबत या वेबसिरीजमध्ये पनाग, जीशान अय्यूब, शरद केलकर, हर्ष छाया और सुशांत सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत. २० डिसेंबरपासून जी५ वर तुम्ही ही वेबसिरीज पाहू शकता.



हेही वाचा

सलमान खानचा 'दबंग ३' वादाच्या भोवऱ्यात

शाहरुखच्या आगामी चित्रपटाच्या 'कहानी'त अभिषेकची एन्ट्री


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा