Advertisement

महेश भूपती, ती आणि टॉवेल


महेश भूपती, ती आणि टॉवेल
SHARES

मुंबईच्या पावसाने मंगळवारी सगळ्यांनाच चांगले झोडपले. फक्त सामान्य मुंबईकरांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही आणि याचे उदाहरण म्हणजे अभिनेत्री लारा दत्ता. मुंबईची मंगळवारी तुंबई झाली होती. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरू लागले होते. त्याचप्रमाणे लारा दत्ताच्या घरी देखील पाणी शिरले होते. घरात पाणी येण्यापासून अडवण्यासाठी लारा दत्ताने एक वेगळीच युक्ती लढवली. पण तिने लढवलेली युक्ती तिच्याच अंगाशी आली. याचे झाले असे की, महेश भूपतीचे सगळे स्पोर्ट्स टॉवेल लाराने दरवाजाच्या खालच्या फटीत कोंबले. दरवाजाच्या फटीतून पाणी येऊ नये म्हणून तिने ही आयडिया अमलात आणली आणि याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यासोबतच कॅप्शनही दिले. मी महेश भूपतीचे युएस ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन आणि फ्रेंच ओपनच्या टॉवेल्सचा योग्य वापर केला, असे कॅप्शन त्याला दिले.



पण झाले उलटेच. बायकोचा ही कल्पना मात्र महेश भूपतीला मात्र पटली नाही. भूपती ट्वीटरवरच तिच्यावर भडकला. तू गंमत करत आहेस का? ही माझी अनेक वर्षांची मेहनत आहे, असे त्याने रागानेच लाराला सुनावले. 



महेश भूपतीचा चढलेला पारा पाहून लाला दत्ताला उत्तर न देणेच योग्य वाटले. पण या सर्वात नेटिझन्सचे मात्र मनोरंजन झाले. नेटिझन्सने दोघांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली.





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा