दुबईतल्या लग्न सोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे क्षण...


SHARE

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीनं बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या 54 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं दुबईत श्रीदेवी यांचं निधन झालं. श्रीदेवी यांचे दीर संजय कपूर यांनी श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.बॉलिवूड अभिनेता मोहित मारवाजच्या लग्नासाठी श्रीदेवी आपल्या कुटुंबियांसोबत दुबईला गेली होती. श्रीदेवीसोबत बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी कपूर दिसत आहेेत.Antara Marwah❤️❤️😘😘

A post shared by  Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on


'धडक' चित्रपटाच्या शुटिंगमुळे जान्हवी कपूर लग्नाला हजर राहू शकली नव्हती. ही दुर्दैवी घटना घडण्याच्या काही वेळ आधी श्रीदेवी यांनी लग्न सोहळ्यातले काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.


❤️

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on

 

फोटोमध्ये विवाहित जाडपे, श्रीदेवी, बोनी कपूर आणि खुशी कपूर दिसत आहेत. श्रीदेवी यांचं निधन होण्यापूर्वी काही तास आधीचे हे फोटो आहेत.
अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्कारानं रसिकांच्या मनावर श्रीदेवी यांनी अधिराज्य गाजवलं. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ, तेलुगु, मल्याळम चित्रपटात देखील त्यांनी आपली छाप सोडली आहे. 'ज्युली' या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 'सोलवा सावन' या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारत बॉलिवुडमध्ये आपली छाप उमटवली होती. हेही वाचा

बिग बींना होती अघटीताची चाहूल? श्रीदेवीच्या निधनासंदर्भात केलं ट्वीट

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन


संबंधित विषय
ताज्या बातम्या