Advertisement

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन


सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन
SHARES

अभिनय, सौंदर्य आणि नृत्यविष्कारानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं श्रीदेवी यांचं दुबईमध्ये निधन झाल्याचं समोर आलं आहे. त्या ५४ वर्षांच्या होत्या. दुबईतल्या एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं ट्वीट देखील करण्यात आलं आहे. बॉलिवूडमधले कलाकार तसंच श्रीदेवीच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.


 
एका लग्न सोहळ्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर तिच्या धडक चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत होती. पण ही बातमी मिळताच ती सेटवरून तात्काळ निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी बाल कलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात केली. हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ, तेलुगु, मल्याळम चित्रपटात देखील त्यांनी आपली छाप सोडली आहे. ज्युली या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.



हेही वाचा

दुबईतल्या लग्न सोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे क्षण

बिग बींना होती अघटिताची चाहूल?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा