Advertisement

बिग बींना होती अघटिताची चाहूल?


बिग बींना होती अघटिताची चाहूल?
SHARES

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीनं बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या 54 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं दुबईत त्यांचं निधन झालं. श्रीदेवी यांचे दीर संजय कपूर यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. एका लग्न सोहळ्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत दुबईला गेल्या होत्या.

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी शनिवारी मध्यरात्री कळाली. अनेकांनी श्रीदेवी यांच्या निधनासंदर्भात ट्वीट करण्यास सुरुवात केली होती. सोशल मीडियावर श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी व्हायरल होऊ लागली होती. पण या ट्वीटमध्ये आणखी एक ट्वीट असं होतं की जे श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा देणारं होतं. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटमध्ये एक इशारा होता.


 
बिग बींनी ट्वीटमध्ये म्हटलं की, 'न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है !!'
 
श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर तिच्या 'धडक' चित्रपटाच्या शुटिंगसाठी मुंबईत होती. पण ही बातमी मिळताच ती सेटवरून तात्काळ निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. श्रीदेवी या बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता.



हेही वाचा

श्रीदेवी दुबईत पडल्या, तेव्हा नक्की काय झालं?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा