Advertisement

राज कुंद्रा प्रकरणामुळे उमेश कामतला मनःस्ताप, फोटो वापरणाऱ्यांविरोधात करणार कारवाई

काही माध्यमांनी राज कुंद्राचा सहकारी उमेश कामत म्हणून मराठी अभिनेता उमेश कामतचा फोटो प्रसारित केला. यावरून उमेश कामत सोबतच मराठी इंडस्ट्रिनं संताप व्यक्त केला आहे.

राज कुंद्रा प्रकरणामुळे उमेश कामतला मनःस्ताप, फोटो वापरणाऱ्यांविरोधात करणार कारवाई
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहे. पॉर्न चित्रपट तयार करून ते अॅपवर स्ट्रीम केल्याचा त्याच्यावर आरोप राज कुंद्रावर आहे. न्यायालयानं २३ जुलैपर्यंत त्याला कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणात राज कुंद्राचा सहकारी उमेश कामत यालाही अटक झाली आहे. पण याच नाव साधर्म्यामुळे मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत या मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

काही माध्यमांनी राज कुंद्राचा सहकारी उमेश कामत म्हणून अभिनेता उमेश कामतचा फोटो प्रसारित केला. त्यानंतर उमेश कामतनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे. शिवाय त्यानं याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

अभिनेता उमेश कामतनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं की, 'आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, या प्रकरणातील एक आरोपी 'उमेश कामत' याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जात आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरलं जाईल. याप्रकरणी मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन.'

अभिनेता जितेंद्र जोशी, मृण्मयी देशपांडे, सुयश टिळक, प्राजक्ता माळी, ऋजुता देशमुख, अमृता खानविलकर, रोहिणी निनावे यांच्यासह अनेकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. 'अतिशय निंदनीय गोष्ट आहे. कृपया योग्य ती कारवाई कर. आम्ही सर्व मित्र तुझ्या सोबत आहोत,' असं जितेंद्र जोशीनं म्हटलं आहे.

तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनंदेखील उमेश कामतला पाठिंबा देत म्हटलं की, 'आम्ही तूझ्या बरोबर आहोत. मी तुला लढ नाही म्हणणार. आपण सगळे लढू आसं म्हणेन..इतकी घाई??? इतका बेजबाबदार पणा?'

माध्यमांनी चुकीचा फोटो वापरत बातम्या दिल्यानंतरही चूक न सुधारता कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त न केल्याची खंत उमेश कामतनं व्यक्त केली आहे.

दरम्यान, पॉर्न फिल्म तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी सायंकाळी व्यावसायिक राज कुंद्राशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. पोलिसांनी मुंबईतील विआन इंडस्ट्रीज लिमिटेडचे ऑफिस तसेच इतर काही ठिकाणांवर छापे टाकले.

पोलिसांनी आतापर्यंत वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा ७.२१ कोटी रुपये गोठवले आहेत. पोलिसांना हॉटशॉट्स मोबाइल अॅपद्वारे बनवलेल्या कुंद्राच्या खात्यात बँक व्यवहार आढळला आहे. या खात्यातून दुसऱ्या एका खात्यातील अखेरचा व्यवहार जानेवारी २०२१ मध्ये झाला होता.


हेही वाचा

'झिम्माड' रिफ्रेशिंग अनुभव देणारा अमृता नातूचा नवा म्युझिक व्हिडिओ!

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार – अमित देशमुख

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा