Advertisement

अक्षयच्या आवाजात नारीशक्तीचा गौरव करणारा 'मिशन मंगल'चा मराठमोळा प्रोमो

सिनेप्रेमींना आता प्रतीक्षा आहे ती १५ आॅगस्टची. कारण या दिवशी प्रदर्शित होणार आहे 'मिशन मंगळ'. मंगळावर स्वारी करणाऱ्या भारतीयांची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाचा अक्षय कुमारच्या आवाजातील मराठमोळा प्रोमो पाहिला का?

अक्षयच्या आवाजात नारीशक्तीचा गौरव करणारा 'मिशन मंगल'चा मराठमोळा प्रोमो
SHARES

सिनेप्रेमींना आता प्रतीक्षा आहे ती १५ आॅगस्टची. कारण या दिवशी प्रदर्शित होणार आहे 'मिशन मंगल'. मंगळावर स्वारी करणाऱ्या भारतीयांची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाचा अक्षय कुमारच्या आवाजातील मराठमोळा प्रोमो पाहिला का?

'तिच्या बांगड्यांची किणकीण...' या मुखड्याच्या कवितेसह 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटाचा मराठमोळा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणारा आणि चांगलं मराठी बोलता येणाऱ्या अक्षय कुमारनं 'असो भले आभाळ कितीही उंचावर, उमटेल त्यावर तिच्या कुंकवाचा मळवट...' अशा शुद्ध मराठी शब्दरचनेच्या या कवितेत आपल्या खास शैलीनं एक वेगळाच रंग भरला आहे. ही कविता नारीशक्तीची गौरवगाथा सांगणारी आहे. भारतीय मंगळ अभियानामध्ये स्त्री शास्त्रज्ञांचा खूप मोलाचा सहभाग होता. हा प्रोमो जणू त्यांच्या कार्याचा गौरव करणारा असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भारताच्या मंगळावर पोहोचण्याचा प्रवासावर आधारित असलेल्या 'मिशन मंगल' या चित्रपटात अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, किर्ती कुल्हारी या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नायिकांनीही अभिनय केला आहे. याशिवाय शरमन जोशी, एच. जी. दत्तात्रेय, संजय कपूर, दलिप ताहील, विक्रम गोखले, मोहम्मद झशीन अयूब यांच्याही भूमिका आहेत. जगन शक्ती यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. पटकथा लेखन आर. बाल्की, जगन शक्ती, साकेत कोंडीपार्थी, साजिद-फरहाद यांचं आहे.

http://bit.ly/YehSindoorMarathi

https://www.youtube.com/watch?v=JOywn_FyG7Q&feature=youtu.be



हेही वाचा -

'मिशन मंगल'ला मनसेचं ग्रहण

‘सुपर ३०’ महाराष्ट्रात झाला टॅक्स फ्री!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा