Advertisement

‘सुपर ३०’ महाराष्ट्रात झाला टॅक्स फ्री!

हृतिक रोशन स्टारर ‘सुपर 30’ सिनेमाला देशभरातील ६ प्रमुख राज्यांत टॅक्स फ्री घोषित करण्यात आलं आहे. मंगळवारी महाराष्ट्रातही या सिनेमाला टॅक्स फ्री करण्याची घोषणा करण्यात आली.

‘सुपर ३०’ महाराष्ट्रात झाला टॅक्स फ्री!
SHARES

हृतिक रोशन स्टारर ‘सुपर 30’ सिनेमाला देशभरातील ६ प्रमुख राज्यांत टॅक्स फ्री घोषित करण्यात आलं आहे. मंगळवारी महाराष्ट्रातही या सिनेमाला टॅक्स फ्री करण्याची घोषणा करण्यात आली. सद्यस्थितीतील शिक्षण व्यवस्थेवर आधारीत या सिनेमाला सिनेप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

‘सुपर 30’ टॅक्स फ्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना या सिनेमातील मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता हृतिक रोशन म्हणाला की, इतक्या राज्यांत तिकीटांचे दर कमी झाल्यामुळे आता हा सिनेमा बघायला आणखी प्रेक्षक सिनेमागृहात येतील. सिनेमा टॅक्स फ्री करण्यासाठी तसंच चांगला प्रतिसाद देण्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार.' 

 

‘सुपर 30’ सिनेमात समाज व्यवस्थेच्या सक्षमीकरणात शिक्षकांचं असलेलं महत्त्व विषद करण्यात आलं आहे. एखाद्या व्यक्तिला घडवण्यात त्याला शिक्षणासोबतच संस्कार देण्यात शिक्षकांचं किती मोलाचं योगदान असतं. हे एका लढ्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे हा सिनेमा सर्व स्तरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.  

१२ जुलै रोजी रिलिज झालेला हा सिनेमा अजूनही बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई करत आहे. आतापर्यंत १२७ कोटी रुपयांची कमाई करत हा सिनेमा सुपरहिट सिनेमांच्या यादीत जाऊन बसला आहे.   हेही वाचा-

शिवानी मारणार 'अल्टी पल्टी'

फरहानला परेश देणार बॅाक्सिंगचे धडेRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा