Advertisement

शिवानी मारणार 'अल्टी पल्टी'

शिवानी म्हटल्यावर कदाचित प्रेक्षकांच्या लगेच लक्षात येणार नाही, पण 'लागीरं झालं जी'मधील शीतली म्हटलं तर लगेच डोळ्यांसमोर शिवानी बावकरचा चेहरा उभा राहील. हीच शिवानी आता 'अल्टी पल्टी' करत नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

शिवानी मारणार 'अल्टी पल्टी'
SHARES

शिवानी म्हटल्यावर कदाचित प्रेक्षकांच्या लगेच लक्षात येणार नाही, पण 'लागीरं झालं जी' मधील शीतली म्हटलं तर लगेच डोळ्यांसमोर शिवानी बावकरचा चेहरा उभा राहील. हीच शिवानी आता 'अल्टी पल्टी' करत नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


७ ऑगस्टपासून प्रसारीत

शिवानीनं 'लागीरं झालं जी'मध्ये साकारलेली शीतली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. शीतली आणि तिचं गुडलक खूप गाजलं. त्यानंतर शीतली आणि अजा या जोडीनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. ही मालिका संपल्यानं शीतली जरी प्रेक्षकांना भेटणार नसली तरी शिवानी मात्र नव्या लुकमध्ये आपल्या चाहत्यांना भेटायला उत्सुक झाली आहे. 'अल्टी पल्टी सुमडीत कल्टी' या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ७ ऑगस्टपासून झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारीत होणार आहे.


पल्लवीची भूमिका

'लागीरं झालं जी' मालिकेतील शीतली गावाकडची होती, पण बिनधास्त आणि धाडसी होती. तिची काही ध्येयं होती. ती साध्य करण्यात शीतली यशस्वीही झाली. 'अल्टी पल्टी सुमडीत कल्टी' या मालिकेत शिवानीनं पल्लवी नावाच्या तरुणीची भूमिका साकारत आहे. या व्यक्तिरेखेबाबत ती म्हणाली की, या मालिकेत मी साकारत असलेली पल्लवी लहानपणापासूनच खूप हुशार आहे. फक्त अभ्यासातच नव्हे, तर ती एकंदरीतच खूप स्मार्ट आहे. तिची स्वप्नं खूप मोठी असून, तिला टिपिकल आयुष्य जगायचं नाही. स्वप्नं मोठी असतात, तेव्हा परिस्थितीला शरण जाऊन माणसानं आयुष्याशी तडजोड करू नये तर ती परिस्थिती स्वतः बदलली पाहिजे, अशा मताची पल्लवी आहे.  


भिन्न स्वभावाच्या व्यक्तिरेखा

'लागीरं झालं जी'मधील शीतली आणि 'अल्टी पल्टी सुमडीत कल्टी'मधील पल्लवी या दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तिरेखा आहेत. यातील फरक सांगताना शिवानी म्हणाली की, शीतलीची व्यक्तिरेखा खूप वेगळी होती. तिने तिच्या फौजी नवऱ्याच्या देशप्रेमावर प्रेम केलं. इतकंच नव्हे तर त्याच स्वप्नं जगण्यासाठी ती स्वतः देखील आर्मीमध्ये भरती झाली, पण अल्टी पल्टीमधील पल्लवी खूपच वेगळी आहे. तिला टिपिकल आयुष्य जगायचं नसून, समाजानं घालून दिलेल्या चौकटींमध्येही तिला राहायचं नाही. त्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. तिचा हेतू वाईट नसल्यामुळं चांगल्या लोकांना कधीच तिच्यापासून नुकसान होणार नाही.


आत्मविश्वास दुणावला

शीतलीला जसं प्रेक्षकांनी प्रेम दिलं तसंच प्रेम पल्लवीलाही मिळेल असा ठाम विश्वास शिवानीला आहे. मालिकेच्या प्रोमोजनंतर मिळालेल्या प्रतिक्रियांमुळं शिवानीचा आत्मविश्वास दुणावला आहे. ती म्हणाली की, 'लागिरं झालं जी' संपल्यानंतर मला अनेक चाहत्यांचे मेसेजेस आले. सोशल मीडियावर त्यांनी माझ्या पोस्ट्सवर प्रतिक्रिया दिल्या. या सर्व प्रतिक्रिया मी वाचल्या. कारण त्यांनी त्या भावूक होऊन दिल्या होत्या. चाहत्यांसोबत माझं एक अतूट नातं तयार झालं होतं. त्यामुळं जेव्हा मी नवीन मालिकेत दिसणार असल्याचा माझ्या इतकाच प्रेक्षकांनाही आनंद झाला. प्रोमोज रिलीज झाल्यावर मला लगेचच मेसेजेस येऊ लागले. त्यांचा उत्साह बघून मला खूप छान वाटलं.


मजेशीर प्रसंग

'अल्टी पल्टी सुमडीत कल्टी' या मालिकेच्या कथानकाबाबत सांगायचं तर ही कथा अशा दोन व्यक्तींची आहे, ज्यांची स्वप्नं खूप मोठी आहेत. आपापल्या स्वप्नपूर्तीसाठी दोघंही एकत्र एक प्रवास सुरू करतात. त्यांचा हा प्रवास अल्टी पल्टी या मालिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या मालिकेत खूप मजेशीर प्रसंग प्रेक्षकांच्या भेटीस येतील. या मालिकेची हाताळणी खूप वेगळ्या पद्धतीनं केली असल्याचंही मालिकेच्या टीमच्या वतीनं सांगण्यात येत आहे. शिवानीची ही मालिका देखील 'लागीरं झालं जी'सारखी जादू करण्यात यशस्वी होते का ते पाहू.हेही वाचा  -

पुरू बेर्डेंचा कुंचला म्हणतोय, 'बोल राजा बोल'

शबाना आझमी खाणार 'शीर कोर्मा'संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा