Advertisement

पुरू बेर्डेंचा कुंचला म्हणतोय, 'बोल राजा बोल'

हजार शब्दांच्या लेखापेक्षा एखादं व्यंगचित्र आमूलाग्र बदल घडवण्याचं काम करतं हे आजवर बऱ्याच चित्रकारांच्या कुंचल्यानं दाखवून दिलं आहे.

पुरू बेर्डेंचा कुंचला म्हणतोय, 'बोल राजा बोल'
SHARES

हजार शब्दांच्या लेखापेक्षा एखादं व्यंगचित्र आमूलाग्र बदल घडवण्याचं काम करतं हे आजवर बऱ्याच चित्रकारांच्या कुंचल्यानं दाखवून दिलं आहे. त्यामुळंच निर्माता-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सध्या सुरू असलेल्या मोबाइल आणि नाटक या समस्येवर रेखाटलेलं हे व्यंगचित्र फारच बोलकं वाटतं.

अभिनयाचा रसभंग

'अश्रूंची झाली फुले' या नाटकात अचानक एका रसिकाचा मोबाइल वाजला आणि अभिनेता सुबोध भावेच्या अभिनयाचा रसभंग झाला. संतप्त झालेल्या सुबोधनं बेजबाबदार रसिकांसाठी थेट एक पोस्टच लिहीली. ज्यात नाटक पाहण्याऐवजी रसिकांना मोबाइलच जास्त महत्त्वाचा वाटत असेल तर त्यांच्या आणि मोबाइलच्या मध्ये येण्याऐवजी नाटकच न केलेलं बरं अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. घडल्या प्रकाराबाबत नाट्य-सिनेसृष्टीतूनही प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. लेखन आणि दिग्दर्शनासोबतच चित्रकार अशी ख्याती असणाऱ्या पुरू बेर्डे यांनी मात्र आपल्या भावना आणि उद्भवलेल्या समस्येवर व्यंगचित्र रेखाटत जणू निर्मात्यांना रामबाण इलाजच सुचवला आहे.

तिकीट खरेदी

पुरू यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीवर एक रसिक तिकीट खरेदी करायला आलेला आहे. तिकीट काऊंटरवर एक पाटी आहे. या पाटीवर 'बोल राजा बोल' असं नाटकाचं शीर्षक लिहीलं असून, त्या खाली तिकीटाचे दर लिहिण्यात आले आहेत. 'मोबाइलसह ७५० रुपये' आणि 'विनामोबाइल ३५० रुपये'... असं केलं तर नाटक पहायला येणारे मोबाइलप्रेमी रसिक ताळ्यावर येतील असंच जणू पुरू यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून सुचवलं आहे.

नाटकांची पब्लिसिटी

पुरु आणि त्यांची रेखाचित्र ही नाट्यरसिकांसाठी नवी गोष्ट नाही. रेखाचित्रांच्या माध्यमातून कशा प्रकारे नाटकांची पब्लिसिटी केली जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण पुरू यांनी फार वर्षांपूर्वीच सेट केलं आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून काहीसा मागे पडलेला त्यांचा कुंचला 'नाटक वर्सेस मोबाइल' असा सामना सुरू होताच पुन्हा पुढं आला आणि त्यातून जे व्यंगचित्र बाहेर आलं ते सुजाण नाट्य रसिकांसाठी मार्मिक उपदेश करणारं आहे.हेही वाचा -

शबाना आझमी खाणार 'शीर कोर्मा'

सुनील शेट्टीचा 'पहलवान' लुक पाहिला का?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा