Advertisement

शबाना आझमी खाणार 'शीर कोर्मा'

आजवर नेहमीच काहीशा हटके भूमिकांना न्याय देणाऱ्या शबाना आझमी पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'शीर कोर्मा' या आगामी हिंदी चित्रपटात शबाना यांचा नवा चेहरा पहायला मिळणार आहे.

शबाना आझमी खाणार 'शीर कोर्मा'
SHARES

आजवर नेहमीच हटके भूमिकांना न्याय देणाऱ्या शबाना आझमी पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'शीर कोर्मा' या आगामी हिंदी चित्रपटात शबाना यांचा नवा चेहरा पहायला मिळणार आहे.

स्वादिष्ट शीर्षक

मनोरंजनासोबतच देशाच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शबाना आझमी यांनी आजवर साकारलेल्या बऱ्याच भूमिका कायमच्या स्मरणात राहणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळंच त्या जेव्हा एखादा चित्रपट स्वीकारतात, तेव्हा त्या चित्रपटाकडं पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलतो. त्यात चित्रपटाचं शीर्षकही हटके असेल तर उत्सुकता शीगेला पोहोचते. दिग्दर्शक फराझ अन्सारी सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. 'शीर कोर्मा' असं काहीसं स्वादिष्ट शीर्षक असलेल्या या चित्रपटात शबाना आझमीसुद्धा झळकणार आहेत.

आईच्या भूमिकेत

खरं तर शीर कुर्मा ही एक स्वादिष्ट डीश म्हणून लोकं मोठ्या आवडीनं खातात, पण या चित्रपटाचं शीर्षक शीर कुर्मा असं थेट न ठेवता 'शीर कोर्मा' असं का ठेवण्यात आलं आहे हे गुपित अद्याप उलगडलेलं नाही. या चित्रपटात शबाना एका आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिव्या दत्ता आणि स्वरा भास्कर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असून, या दोघी लेस्बियन कपलची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात शबाना एकविसाव्या शतकातील आई साकारताना दिसणार असल्याचं दिग्दर्शकांकडून सांगण्यात येत आहे. या आठवड्यातच मुंबईमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे.हेही वाचा -

गोविंदा पथक आणि आयोजकांना परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार

लोकलच्या दिव्यांगांच्या डब्यातून गरोदर महिलांना करता येणार प्रवाससंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा