Advertisement

सुनील शेट्टीचा 'पहलवान' लुक पाहिला का?

गत वर्षी मराठी चित्रपटाचा स्वाद चाखणारा अभिनेता सुनील शेट्टी आता एका नव्या लुकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'पहलवान' या आगामी हिंदी चित्रपटातील शेट्टी लुक रिव्हील झाला आहे.

सुनील शेट्टीचा 'पहलवान' लुक पाहिला का?
SHARES

गत वर्षी मराठी चित्रपटाचा स्वाद चाखणारा अभिनेता सुनील शेट्टी आता एका नव्या लुकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'पहलवान' या आगामी हिंदी चित्रपटातील शेट्टी लुक रिव्हील झाला आहे.

५०० डांसर्ससह डांस

कृष्णा दिग्दर्शित 'पहलवान' चित्रपटातील 'जय हो पहेलवान...' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटिला आलं आहे. त्यासोबतच या चित्रपटातील सुनील शेट्टीचा दमदार फर्स्ट लुक समोर आला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं बऱ्याच काळानंतर सुनील शेट्टी कन्नड सुपरस्टार सुदीपासोबत मोठ्या स्क्रीनवर तब्बल ५०० डांसर्ससह डांस करताना दिसत आहे. 'जय हो पहेलवान...' या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केली आहे. हे गाणं व्यास राज, देव नेगी, अमित मटेरेजा यांनी गायलं असून, संगीतकार अर्जुन जन्य यांनी स्वरसाज चढवला आहे.

धमाल अनुभव

मागच्या वर्षी सुनीलनं 'अ ब क' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री केली आहे. या चित्रपटात त्यांनी पाहुणा कलाकार म्हणून काम करत बाप्पा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. आता 'पहलवान' या चित्रपटाद्वारे तो पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. याबाबत सुनील म्हणाला की, या चित्रपटातील मी माझ्या लुक बद्दल आणि भूमिकेबद्दल खूप उत्साहीत असून, मला लुक आणि भूमिका खूप आवडली आहे, बऱ्याच काळानंतर मी डांसही केला आहे. त्यामुळं या चित्रपटाचं शूटिंग करताना एक धमाल अनुभव आला.

२५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित

झी स्टुडिओज आणि आरआरआर मोशन पिक्चर्स द्वारा निर्मित 'पहलवान' हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळममध्ये या ५ भाषांमध्ये १२ सप्टेंबरला जवळपास २५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या 'खानदानी शफाखाना' या चित्रपटातील तो 'शहर की लडकी...' या गाण्यावर डायना पेंटी आणि रवीना टंडन यांच्यासोबत धडाकेबाज परफॅार्मंस करताना दिसणार आहे. याशिवाय सुनीलचे 'हेरा फेरी ३', 'तानाजी : द अनसंग वॅारीयर' या हिंदी चित्रपटांसह 'मराकर' या मल्याळम आणि तमिळ 'दरबार'मध्येही झळकणार आहे.हेही वाचा -

एनएमसी विधेयकाविरोधात देशभरातील डॉक्टर करणार उपोषण

कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटकसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा