Advertisement

एनएमसी विधेयकाविरोधात देशभरातील डॉक्टर करणार उपोषण

नॅशनल मेडिकल कमिशनच्या मुद्द्यावरून देशभरातील डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेत एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

एनएमसी विधेयकाविरोधात देशभरातील डॉक्टर करणार उपोषण
SHARES

नॅशनल मेडिकल कमिशनच्या मुद्द्यावरून देशभरातील डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेत एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या या उपोषणामुळं बुधवारी ओपीडी बंद राहणार आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळपासून रुग्णालयातील सर्व सेवा बंद राहणार असून, या आंदोलनामध्ये देशभरातील डॉक्टरांनी सहभागी व्हावं, असं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशननं केलं आहे. यादरम्यान, उपोषण, कामबंद आंदोलन तसंच इतर माध्यमांतून डॉक्टर नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) विधेयकाला विरोध करणार आहेत.

विधेयक लोकसभेत संमत

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या जागी नॅशनल मेडिकल कमिशन स्थापन करण्याबाबतचे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या बदलांमुळं वैद्यकीय शिक्षणक्षेत्रातील इन्स्पेक्टर राज संपणार असल्याचा दावा केंद्र सरकारनं केला आहे. हे विधेयक लोकसभेत २६० विरुद्ध ४८ मतांनी संमत झाले.

स्क्रिनिंग टेस्टचा दर्जा

एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षेचा तसंच विदेशातून वैद्यकीय पदवीधर झालेल्यांसाठी होणाऱ्या स्क्रिनिंग टेस्टचा दर्जा या विधेयकातील तरतुदींनुसार मिळणार आहे. ही परीक्षा नॅशनल एक्झिट टेस्ट (नेक्स्ट) या नावानं ओळखली जाणार आहे. वैद्यकीय शिक्षणात एकसूत्रता आणण्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक तयार करण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं.



हेही वाचा -

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला १ ऑगस्टपासून सुरुवात

मुंबई घाण करणाऱ्यांवर पोलिस नोंदवणार गुन्हे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा