Advertisement

फरहानला परेश देणार बॅाक्सिंगचे धडे

अभिनयात तरबेज असलेल्या अभिनेते परेश रावल यांना बरेच कलाकार आदर्श मानतात, पण ते मात्र आता बॅाक्सिंगचे धडे देण्यासाठी सज्ज झाले आहेत. फरहान अख्तरला ते बॅाक्सिंग शिकवणार आहेत.

फरहानला परेश देणार बॅाक्सिंगचे धडे
SHARES

अभिनयात तरबेज असलेल्या अभिनेते परेश रावल यांना बरेच कलाकार आदर्श मानतात, पण ते मात्र आता बॅाक्सिंगचे धडे देण्यासाठी सज्ज झाले आहेत. फरहान अख्तरला ते बॅाक्सिंग शिकवणार आहेत.


व्यक्तिरेखा अजरामर

परेश रावल यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या बळावर रुपेरी पडद्यावरील बऱ्याच व्यक्तिरेखा अजरामर केल्या आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी साकारलेले खलनायक जसे स्मरणात राहिले तसेच त्यांच्या अभिनयामुळं सजीव झालेल्या 'हेरा फेरी' चित्रपटामधल्या बाबूरावसारख्या बऱ्याच विनोदी व्यक्तिरेखांनीही प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. आजवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारणारे परेश आता बॅाक्सिंग शिकवताना दिसणार आहेत.


स्पोर्टस-ड्रामा

'भाग मिल्खा भाग' या चित्रपटाच्या निमित्तानं ज्येष्ठ भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांचं जीवनचरीत्र पडद्यावर रेखाटणारे निर्माता-दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा मागील बऱ्याच दिवसांपासून एका स्पोर्टस-ड्रामाच्या कामात गुंतले आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ते फरहान अख्तरसोबत काम करणार आहेत. स्वत: फरहान या चित्रपटाची निर्मिती करत असून, त्याच्या जोडीला मेहरा आणि रितेश सिधवानीही आहेत. या चित्रपटाचं शीर्षक आहे 'तूफान'.


बॅाक्सरची कथा

'तूफान' म्हटलं की आजही १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन अभिनीत चित्रपटाची आठवण येते, पण 'तूफान'चा त्या 'तूफान'शी काहीही संबंध नाही. या चित्रपटात मेहरा एका बॅाक्सरची कथा मांडणार आहेत. यात फरहान बॅाक्सरच्या भूमिकेत दिसणार असून, त्याला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मेहरांनी परेश रावल यांच्यावर सोपवल्यानं ते या चित्रपटात बॅाक्सिंग कोच बनलेले पहायला मिळणार आहेत. आॅगस्ट अखेरपर्यंत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून, पुढल्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हेही वाचा  -

पुरू बेर्डेंचा कुंचला म्हणतोय, 'बोल राजा बोल'

शबाना आझमी खाणार 'शीर कोर्मा'
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा