Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

Video: 'मिशन मंगल'ला मनसेचं ग्रहण, मराठीतल्या डब व्हर्जनला खोपकरांचा विरोध

'मिशन मंगल' हा हिंदी चित्रपट मराठीत डब करून प्रदर्शित होणार आहे. तसं झालं तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा खोपकर यांनी दिला आहे.

Video: 'मिशन मंगल'ला मनसेचं ग्रहण, मराठीतल्या डब व्हर्जनला खोपकरांचा विरोध
SHARES

इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करून रिलीज करण्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपले विचार मांडले आहेत. 'मिशन मंगल' हा हिंदी चित्रपट मराठीत डब करून प्रदर्शित होणार आहे. तसं झालं तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा खोपकर यांनी दिला आहे.


१५ आॅगस्टला प्रदर्शित 

मोठं आंदोलन उभं करण्याची वेळ आली असल्याचं म्हणत खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून 'मिशन मंगल' चित्रपट मराठीत डब करून रिलीज करण्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे. खोपकर म्हणाले की, मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळवण्यासाठी आतापर्यंत बऱ्याच गुरुवारी आणि शुक्रवारी मनसेच्या सहकाऱ्यांसोबत आंदोलन करत आलो आहे. आता तुकडा पाडण्याची वेळ आली आहे. १५ आॅगस्टला अक्षय कुमार यांचा 'मिशन मंगल' हा सिनेमा जगामध्ये हिंदीत प्रदर्शित होत आहे, तो महाराष्ट्रात हिंदीसोबत मराठीतही रिलिज होणार आहे. हिंदी भाषेतील 'मिशन मंगल'ला आमचा विरोध नाही, पण मराठीत डब करण्यामागं फार मोठं षडयंत्र आहे. इतर भाषेतील सिनेमे मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेमांनी करायचं काय? असा प्रश्न खोपकर यांनी उपस्थित केला.


चित्रपटगृहांच्या काचा फुटतील

अक्षय कुमार चांगले सिनेमे बनवतात. मीसुद्धा त्यांचे चित्रपट पाहतो असं म्हणत मराठीत सिनेमे डब करण्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत खोपकर म्हणाले की, मराठीसाठी दरवेळी आंदोलन करायचं का? या विरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं. तुमच्यासोबत मला आंदोलन करायचं आहे. इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्याविरोधात येत्या काही दिवसांत मनचिकसे मोठं आंदोलन उभं करेल. सरकारनं यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर चित्रपटगृहांच्या काचा फुटतील. चित्रपटगृहांच्या मालकांनाही ते परवडणार नाही.


रिशूटला विरोध नाही

एक आघाडीचं मराठी चॅनेल साऊथचे ६० चित्रपट मराठीत डब करून चॅनलवर दाखवणार होतं. याचा अर्थ मराठी चित्रपटसृष्टी संपवायची का? मराठी निर्माते, कलाकार यांना संपवायचं हे षडयंत्र आहे का? असा सवाल उपस्थित करत खोपकर म्हणाले की, 'मिशन मंगल' हा चित्रपट मराठीत मराठीत रिलीज होऊ देणार नाही. इतर राज्यांत त्या त्या भाषेत चित्रपट करता येतील का? साऊथमध्ये त्यांच्या भाषेतील चित्रपटांना प्राधान्य दिलं जातं. आम्हाला इथे मराठीसाठी का भांडावं लागतं? यांना निवेदनाची भाषा आणि नम्र विनंती समजत नसेल तर आम्हालाही नम्र विनंती करायची सवय नाही. मनसेची आंदोलनं आक्रमक असतात. 'मिशन मंगल' हा चित्रपट मराठीत डब करण्यापेक्षा कलाकारांसोबत रिशूट करा. त्याला आमचा विरोध नाही. आमचा केवळ मराठीत डब करून रिलीज करायला विरोध आहे. जर 'मिशन मंगल' मराठीत डब करून हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित केला, तर हिंदी चित्रपटही रिलीज होऊ देणार नाही.हेही वाचा -

‘सुपर ३०’ महाराष्ट्रात झाला टॅक्स फ्री!

शिवानी मारणार 'अल्टी पल्टी'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा