Advertisement

तिथे फक्त आर्यनच होता का? मिका सिंगनं उपस्थित केला प्रश्न

मिका सिंगनं आर्यनच्या अटकेबद्दल व्यंगात्मक टिप्पणी देखील केली आहे.

तिथे फक्त आर्यनच होता का? मिका सिंगनं उपस्थित केला प्रश्न
SHARES

ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खान आणि शाहरुख खानला बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये पूजा भट्ट, हंसल मेहता, नफीसा अली आणि सुझान खान यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे गायक मिका सिंगचं.

गायक मिका सिंगनंही क्रूझचा फोटो शेअर करून त्याचं कौतुक केलं आहे. यासोबतच मिका सिंगनं आर्यनच्या अटकेबद्दल व्यंगात्मक टिप्पणी देखील केली आहे. मोठ्या क्रूझमध्ये फक्त आर्यनच फिरत होता? असा सवाल त्यानं उपस्थित केला आहे.

मिकानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “व्वा कॉर्डेलिया क्रूझ किती सुंदर आहे, माझीही इच्छा होती तिथे जायची. मी ऐकले की बरेच लोक तिथे होते पण मला आर्यन वगळता कोणीही दिसले नाही. एवढ्या मोठ्या क्रूझमध्ये फक्त आर्यन फिरत होता का? शुभ प्रभात, एक अद्भुत दिवस आहे.

गेल्या शनिवारी कॉर्डेलिया क्रूझवर सुरू असलेल्या पार्टीमध्ये एनसीबीनं प्रतिबंधित ड्रग्ज जप्त केलं. यासोबतच काही लोकांना ताब्यात घेतले. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या समावेश आहे.

आर्यन ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत असून त्याची चौकशी केली जात आहे. आर्यन सोबत, पार्टीला उपस्थित असलेल्या मुनमुन धामेचा आणि अरबाज सेठ मर्चंट यांना देखील ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात असतील.



हेही वाचा

'तारक मेहता...' फेम नट्टू काका काळाच्या पडद्याआड

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… दे धक्का २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा