Advertisement

'तारक मेहता...' फेम नट्टू काका काळाच्या पडद्याआड

प्रसिद्ध टीव्ही मालिका तारक मेहतामधील नट्टू काका फेम अभिनेते घनश्याम नायक यांचं निधन झालं आहे.

'तारक मेहता...' फेम नट्टू काका काळाच्या पडद्याआड
SHARES

प्रसिद्ध टीव्ही मालिका तारक मेहतामधील (Tarak Mehta Ka Oooltah Chashmah) नट्टू काका Nattu Kaka) फेम अभिनेते घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांनी नट्टू काका यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आसित कुमार मोदी यांनी ट्वीट केलं आहे. ‘ॐ शान्ति’ असं ट्वीट करत नट्टू काका यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

घनश्याम यांना मागील वर्षी कॅन्सर असल्याचं समजलं होतं. त्यांच्यावर किमोथेरपी केली जात होती. याबद्दल त्यांच्या मुलगा विकास यानं माहिती दिली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांचं गळ्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. ज्यातून त्यांच्या ८ गाठी काढण्यात आल्या होत्या.

घनश्याम यांच्या घशात गाठ तयार झाली होती. त्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होऊ लागला होता. अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं होतं. नट्टू काका लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा तारक मेहतामध्ये परतावेत यासाठी चाहत्यांसह सिरीयलमधील टीमही प्रार्थना करत होती.

मात्र, गेल्या महिन्याच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घनश्याम नायक गेल्या १० वर्षांपासून तारक मेहतामध्ये नट्टू काकांची भूमिका निभावत होते.

घनश्याम नायक यांनी जवळपास ३५० हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नव्हे तर अनेक बॉलिवूड चित्रपटातही ते झळकले होते. सलमान खानच्या ‘हम दिल दे चुके सनम’, ‘तेरे नाम’ यासारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केलं आहे. त्यासोबतच ‘चोरी चोरी’, ‘खाकी’ या चित्रपटातही त्यांची छोटीशी भूमिका साकारली होती. तसंच नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मासूम’ या चित्रपटात बालकलाकार म्हणूनही ते झळकले होते.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा