Advertisement

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… दे धक्का २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आता प्रेक्षकांना दे धक्का २ हा चित्रपट लवकरच पाहता येणार आहे.

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… दे धक्का २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

प्रेक्षकांच्या मनात सुदेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का या चित्रपटानं एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आता प्रेक्षकांना दे धक्का २ हा चित्रपट लवकरच पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. महेश मांजरेकर ‘दे धक्का २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत सांगितली आहे. ‘दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस, महेश मांजरेकर दिग्दर्शित, दे धक्का २, तारीख ठरली!!!

१ जानेवारी २०२२… थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय’ या आशयाचे ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे. लवकरच ‘दे धक्का २’ भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी आहेत.

२००८ मध्ये ‘दे धक्का’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हॉलिवूडमधील २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये ‘क्रेझी कुटुंब’ म्हणून रिमेक करण्यात आला होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केलं होतं. त्यानंतर आता दे धक्का २ हा चित्रपट १ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ‘दे धक्का २’मध्ये काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.हेही वाचा

राजिनामा नवज्योत सिंग सिद्धूंचा, पण चर्चेत अर्चना पुरणसिंग

पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन वादात सापडले अमिताभ बच्चन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा