Advertisement

राजिनामा नवज्योत सिंग सिद्धूंचा, पण चर्चेत अर्चना पुरणसिंग

राजीनामा नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला आहे मात्र अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) यांचं नाव सोशल मीडियावर चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.

राजिनामा नवज्योत सिंग सिद्धूंचा, पण चर्चेत अर्चना पुरणसिंग
SHARES

नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली आहे. राजीनामा नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला आहे मात्र अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) यांचं नाव सोशल मीडियावर चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर अर्चना पूरन सिंह यांची खुर्ची धोक्यात अल्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

'द कपिल शर्मा शो'ची परीक्षक म्हणून सध्या अर्चना पूरन सिंह काम पाहत आहेत. मात्र यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू या शोचे परीक्षक म्हणून काम पाहत होते. परंतु शोमध्ये पाकिस्तानबद्दल त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला, ज्यामुळे त्यांना हा शो सोडावा लागला. यानंतर, शोमध्ये त्यांच्या जागी अर्चना पूरन सिंह यांची परीक्षक म्हणून वर्णी लागली.

आता सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर अशा पोस्टचा सोशल मीडियावर पूरच आला आहे. ज्यामध्ये त्यांची खिल्ली उडवत आहेत आणि ट्रोल करत आहेत.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा