Coronavirus cases in Maharashtra: 443Mumbai: 235Pune: 48Islampur Sangli: 25Ahmednagar: 17Nagpur: 16Pimpri Chinchwad: 15Thane: 14Kalyan-Dombivali: 9Navi Mumbai: 8Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 21Total Discharged: 42BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Movie Review: लैंगिक धडे देत बोलायलाही शिकवणारा 'शफाखाना'

अपुऱ्या ज्ञानामुळं काही तरुण-तरुणींना लैंगिक समस्येला सामोरं जावं लागत आहे. 'खानदानी शफाखाना' हा चित्रपट यावरच भाष्य करणारा आहे.

Movie Review: लैंगिक धडे देत बोलायलाही शिकवणारा 'शफाखाना'
SHARE

आजही आपल्याकडे काही ठिकाणी जिथं लैंगिक समस्येवर उपचार घेणं टाळलं जातं, तिथं लैंगिक शिक्षणाबाबत बोलणं आणि त्यावर चर्चा करणं तर दूरच राहिलं. मेट्रो सिटीजमधील नागरिक याबाबत जागरूक असले तरी छोट्या शहरांमध्ये आजही लैंगिक शिक्षणाबाबत उघडपणे बोलणं पाप मानलं जात आहे. त्यामुळंच अपुऱ्या ज्ञानामुळं काही तरुण-तरुणींना लैंगिक समस्येला सामोरं जावं लागत आहे. 'खानदानी शफाखाना' हा चित्रपट यावरच भाष्य करणारा आहे.


सेक्स क्लिनीक

दिग्दर्शिका शिल्पी दासगुप्ता यांनी पदार्पणातच एक असा विषय निवडला आहे, ज्यावर आपल्याकडं उघडपणे बोलणं टाळलं जातं. सेक्स क्लिनीकच्या माध्यमातून या विषयावर त्यांनी भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा महिला प्रधान चित्रपट सोनाक्षी सिन्हासाठी पुन्हा एकदा चालून आलेली एक मोठी संधी असल्याचं मानलं जात होतं. चित्रपटामध्ये 'बात तो करो' अशा आशयाची पत्रकं वाटत लैंगिक शिक्षणावर बोलण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या या चित्रपटामुळं समाजात या विषयावर उघडपणे बोलायला जरी सुरू झाली तरी हा चित्रपट बनवण्यामागील हेतू साध्य होईल.


मामाजींचा दवाखाना 

हा 'खानदानी शफाखाना' आहे हिंदुस्थानी युनानी रिसर्च सेंटरचे सदस्य असलेल्या तसंच सेक्स क्लिनीक चालवणाऱ्या मामाजी (कुलभूषण खरबंदा)यांचा. जगासाठी मामाजी असणारं हे व्यक्तिमत्व सोनाक्षी सिन्हानं साकारलेल्या बेबी बेदीचे सख्खे मामा आहेत. लैंगिक समस्यांवर यशस्वी उपचार करणाऱ्या मामाजींची हत्या होते. त्यानंतर मामाजींच्या मृत्यूपत्रानुसार वकील टागरा (अनु कपूर) दवाखान्याची मालकी बेबीकडे सोपवतात, पण मामाजींनी मृत्यूपत्रात एक अट घातलेली असते. या अटीनुसार मामाजींच्या मृत्यूनंतर सलग सहा महिने बेबी जर हा दवाखाना सुरळीतपणे चालवू शकली तरच तो तिचा होणार असतो. मेडीकल रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून नोकरी करणाऱ्या बेबीच्या खांद्यावर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी असते. रिकामटेकडा भाऊ (वरुण शर्मा)आणि आई (नंदिता बब्बर) यांना सांभाळत तिला काकांकडून घेतलेलं कर्जही परत फेडायचं असतं. त्यामुळं ती मामाजींचा दवाखाना चालवायचा निर्णय घेते. त्यानंतर तिला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो ते या चित्रपटात आहे.


ठराविक वेळानंतर कंटाळा 

चित्रपटाचा विषय चांगला आहे. एका दवाखान्याच्या माध्यमातून तो मांडण्याची संकल्पनाही चांगली आहे, पण पटकथेची मांडणी आणखी उत्कंठावर्धक असणं गरजेचं होतं. पटकथेत गंमतीशीर आणि कुतूहल वाढवणाऱ्या घटनांचा अभाव जाणवतो. बेबीनं दवाखाना सुरू केल्यानंतर किरकोळ समस्यांखेरीज तिच्यासमोर कोणतंच फार मोठं आव्हान नसतं. हा खेळ केवळ नातेवाईक आणि आजूबाजूच्या दुकानदारांपुरताच मर्यादित ठेवला जातो. त्यामुळं दवाखाना टिकवण्यासाठी तिनं केलेला संघर्ष प्रभावी वाटत नाही. चित्रपटात कुठेही विनोद निर्मिती करण्याचाही प्रयत्न केला गेलेला नसल्यानं एका ठराविक वेळानंतर कंटाळा येऊ लागतो.


सादरीकरणाची जोड नाही

अखेरीस प्रकरण जेव्हा न्यायालयात पोहोचतं तेव्हा तिथले प्रसंगही रंजकपणे सादर करण्याची गरज होती. न्यायालयात प्रकरण गेल्यानं न्यायाधीशांच्या उपस्थितीतच चर्चा सुरू होते. मध्येच कोणीही उठून बोलतो काय? आपसात बोलणं सुरू असतं काय? काहीही चाललेलं असतं. कॅमेरावर्क आणि इतर तांत्रिक गोष्टी दर्जेदार आहेत. 'बेबी, सास तो ले ले...' हे गाणं चांगलं झालं आहे. दिग्दर्शिका या नात्यानं शिल्पी दासगुप्ता यांनी एक चांगला विषय पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी तो तितकासा यशस्वी झालेला नाही. चांगल्या विषयाला पटकथा आणि सादरीकरणाची उत्तम जोड न मिळाल्यानं गडबड झाली आहे.


रॅपर बादशाहची झलकही

सोनाक्षी सिन्हानं साकारलेली बेबी बिनधास्त, बोलकी आणि समजदारही आहे. आपण काय केल्यानं काय होऊ शकतं याचं भान असूनही ती एक निर्णय घेते आणि कोणाचाही पाठिंबा नसताना त्यावर ठाम रहात यशस्वी होते. या कारणांमुळंच सोनाक्षीची ही भूमिका खूप वेगळी वाटते. वरुण शर्मानं आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कॅामेडी करण्याचा केलला प्रयत्न चांगला आहे. प्रियांशू जोरानं वेळोवेळी सोनाक्षीला कानमंत्र देत मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. कुलभूषण खरबंदा यांनी साकारलेली मामाजींची छोटीशी भूमिका चांगली झाली आहे. पुन्हा अन्नू कपूर यांनी झकास अभिनय केला आहे. रॅपर बादशाहची झलकही या चित्रपटात आहे. इतर कलाकारांचीही त्यांना चांगली साथ लाभली आहे.

हा चित्रपट लैंगिक शिक्षणावर भाष्य करणारा असला तरी सादरीकरण आणि मांडणी तितकीशी प्रभावीपणे करण्यात आलेली नाही. कलाकारांचा अभिनय पहायचा असेल तर चित्रपट पहायला हरकत नाही.


दर्जा : **

............................

निर्माते : भूषण कुमार, महावीर जैन, मृगदीप सिंग लांबा, दिव्या कुमार खोसला, क्रिशन कुमार

लेखक : गौतम मेहरा

दिग्दर्शिका : शिल्पी दासगुप्ता

कलाकार : सोनाक्षी सिन्हा, वरुण शर्मा, अन्नू कपूर, प्रियांशू जोरा, बादशाह, कुलभूषण खरबंदा, राजेश शर्मा, नंदिता बब्बर, राजीव गुप्ता
संबंधित विषय
ताज्या बातम्या