Advertisement

बालिका वधू फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन, ३ वेळा मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं शुक्रवारी निधन झालं.

बालिका वधू फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन, ३ वेळा मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार
SHARES

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री (Surekha Sikri) यांचं शुक्रवारी निधन झालं. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. कार्डीयाक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या मॅनेजरनं त्यांच्या निधननाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) मध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली होती. तसंच त्यांनी ‘बधाई हो’ (Badhai Ho) या चित्रपटातदेखील लक्षवेधी भूमिका साकारली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या मेनेजरनं सांगितलं की, त्यांनी आज सकाळी शेवटचा श्वास घेतला आहे. दुसऱ्या ब्रेन स्ट्रोक नंतर त्या खूपच चिंतीत होत्या. त्यांना सर्वप्रथम सण २०१८ मध्ये पहिला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना लकवा आला होता. त्यांची तब्येत खूपच चिंतीत होती. त्यांनतर त्या ठीक तर झाल्या मात्र जास्त काम नाही करू शकल्या. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर २०२० मध्ये त्यांना दुसरा ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे त्यांची अवस्था खुपचं गंभीर झाली होती.

दुसऱ्या स्ट्रोकनंतर त्यांची आर्थिक परिस्थिती देखील ठिक नव्हती. उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीचा हात हवा होता. फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांकडे त्यांनी मदत देखील मागितली होती. आपल्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

सुरेखा सिक्री या एक थियेटर अभिनेत्रीही होत्या. तसंच त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये ठळक भूमिका साकारल्या आहेत. त्यांना तब्बल ३ वेळा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये तमस(1988), मम्मो(1995) आणि बधाई हो(2018) या चित्रपटांचा समावेश आहे.

६६ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना चित्रपट ‘बधाई हो’ मधील आज्जीच्या उत्तम भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.


हेही वाचा

बिग बींच्या बंगल्याबाहेर मनसेची पोस्टरबाजी, बंगल्यावरून सुरू झालेला वाद नेमका आहे काय?

प्रेग्नंसीचा अनुभव सांगणारं करीनाचं पुस्तक, पण पोलिसात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा