Advertisement

प्रेग्नंसीचा अनुभव सांगणारं करीनाचं पुस्तक, पण पोलिसात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रेग्नंसीचा अनुभव सांगणारं करीनाचं पुस्तक, पण पोलिसात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?
SHARES

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. करीनानं ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

करीनानं तिच्या नव्या पुस्तकाच्या नावात 'प्रेग्नसी बायबल' (kareena kapoor pregnancy bible) असा शब्द वापरला आहे. त्या नावावर आक्षेप घेण्यात आला आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबद्दल बीडच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये अल्फा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूरनं नुकतेच 'प्रेग्नसी बायबल' या नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकावर बायबल या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. बायबल शब्द वापरण्यात आल्यामुळे बीडमधील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघानं आक्षेप घेतला आहे.

करीना कपूरनं आपल्या पुस्तकावर बायबल शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे पुस्तकाच्या नावातील बायबल हा शब्द तात्काळ हटवावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघानं केली आहे.

या तक्रारीबद्दल अद्याप करीना कपूर आणि पुस्तक प्रकाशकांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु, या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही ख्रिश्चन महासंघाकडून करण्यात आली आहे.



हेही वाचा

दीया मिर्झा झाली आई, मुलगा अद्यापही ICU मध्ये

सलमान खान आणि त्याच्या बहिणीवर फसवणुकीचा आरोप, पोलिसांनी पाठवलं समन्स

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा