Advertisement

‘कान’नंतर ‘सिडनी’मध्ये ‘मंटो’ची वर्णी

तडाखेबंद लेखनशैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या तसंच कित्येकदा वादात अडकलेल्या मंटो यांच्यावर आधारित या सिनेमाची दखल सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येत आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हलसारख्या मानाच्या सिनेमहोत्सवामध्ये सिनेमा दाखवला जाणं हे गौरवास्पद मानलं जातं. १६ आणि १७ जून रोजी ‘मंटो‘ सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणार आहे.

‘कान’नंतर ‘सिडनी’मध्ये ‘मंटो’ची वर्णी
SHARES

आजवरच्या कायमच विविधांगी भूमिका साकारण्यात यशस्वी ठरलेल्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असलेला ‘मंटो’ हा सिनेमा सध्या आंतराष्ट्रीय पातळीवर खूप गाजतोय. अलीकडेच फ्रान्समध्ये झालेल्या ‘कान’ फिल्म फेस्टिव्हल नंतर सिडनी फिल्म फेस्टिव्हलसाठीही ‘मंटो’ची निवड करण्यात आली आहे.

नंदिताचं दिग्दर्शन

अभिनयात आपलं वेगळेपण सिद्ध केल्यानंतर मागील काही वर्षांपासून दिग्दर्शन आणि सिनेनिर्मितीत रमलेल्या नंदिता दासने ‘मंटो’चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात नंदिताने नवाजुद्दीनला उर्दू लेखक सादत हसन उर्फ मंटो यांच्या रूपात सादर केलं आहे. या सिनेमात भारत-पाकिस्तान फाळणीचा काळ पाहायला मिळेल.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

तडाखेबंद लेखनशैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या तसंच कित्येकदा वादात अडकलेल्या मंटो यांच्यावर आधारित या सिनेमाची दखल सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येत आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हलसारख्या मानाच्या सिनेमहोत्सवामध्ये सिनेमा दाखवला जाणं हे गौरवास्पद मानलं जातं. १६ आणि १७ जून रोजी ‘मंटो‘ सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणार आहे.

नवाजुद्दीनची अनुपस्थिती

शीर्षक भूमिकेतील नवाजुद्दीनच्या अनुपस्थितीत सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘मंटो’चा शो रंगणार आहे. नवाजुद्दीन सध्या बाळासाहेब ठाकरेंवर आधारित असलेल्या ‘ठाकरे’ या आगामी हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात नवाजुद्दीन ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा-

१५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर होणार राडा!

वरुणच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा