Advertisement

अभिनय देवचा 'दूसरा' सांगणार भारत बदलणाऱ्या क्रिकेटची कथा

'अ मूव्हमेंट दॅट चेंज अॅन एन्टायर जनरेशन' या वाक्यासह 'दूसरा' या आगामी हिंदी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात भारताला बदलणाऱ्या क्रिकेटची कथा पहायला मिळणार आहे.

अभिनय देवचा 'दूसरा' सांगणार भारत बदलणाऱ्या क्रिकेटची कथा
SHARES

'अ मूव्हमेंट दॅट चेंज अॅन एन्टायर जनरेशन' या वाक्यासह 'दूसरा' या आगामी हिंदी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात भारताला बदलणाऱ्या क्रिकेटची कथा पहायला मिळणार आहे.

क्रिकेटची पार्श्वभूमी

काही दिग्दर्शक नेहमीच प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं आणि डोळ्यांना जे दिसतंय त्याही पलिकडचं दाखवण्याची क्षमता असलेले चित्रपट बनवत असतात. 'दिल्ली बेल्ली', 'ब्लॅकमेल' या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणारा मराठमोळा दिग्दर्शक अभिनय देवही सुरुवातीपासून याच दिग्दर्शकांच्या पंक्तीत विराजमान आहे. 'दूसरा' या आगामी चित्रपटाद्वारे तो क्रिकेटची पार्श्वभूमी असलेली कथा सादर करणार आहे. केवळ एका क्रिकेट टूर्नामेंटनं कसा संपूर्ण भारतीय जनरेशनचा कायापालट केला त्याची कथा 'दूसरा'मध्ये पहायला मिळणार आहे.

नटेवेस्ट क्रिकेट सिरीज

या चित्रपटात अभिनयनं क्रिकेटची सांगड एका मुलीच्या स्वातंत्र्याशी घातली आहे. ट्रेलर पाहिल्यावर ही एका खेडेगावातील मुलीची कथा असल्याचं जाणवतं. पुढे ती शहारील झोपडपट्टीतही दिसते. ट्रेलरमध्ये ज्येष्ठ क्रिकेटर, तज्ज्ञ, पत्रकार, राजकारणी आणि समालोचकांची मतंही पहायला मिळतात. १३ जुलै २००२मध्ये भारतानं जिंकलेल्या नटेवेस्ट क्रिकेट सिरीजमधील अंतिम सामन्यातील दृश्ये या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आहेत. ऐतिहासिक लॅार्डस मैदानावर फायनल जिंकल्यावर माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुलीनं टी शर्ट काढून केलेल्या सेलिब्रेशनची दृश्यं 'दूसरा'च्या ट्रेलरमध्ये आहेत. त्यानंतर भारतात झालेल्या बदलाची कथा चित्रपटात पहायला मिळणार असल्याचं समजतं.

भावनिक स्वातंत्र्य

१९४७ मध्ये राजकीय स्वातंत्र्य, १९९१ मध्ये आर्थिक स्वातंत्र्य, तर २००२ मध्ये भावनिक स्वातंत्र्य मिळाल्याचं 'दूसरा'च्या ट्रेलरमध्ये सांगण्यात आलं आहे. हे स्वातंत्र्य होतं आकाशात उंच भरारी घेण्याचं... त्यामुळंच 'इंडियाज अनदर फ्रीडम स्टोरी' अशी टॅगलाईन 'दूसरा' या टायटलसोबत जोडण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये या चित्रपटाची रिलीज डेट रिव्हील करण्यात आलेली नाही. अँजेलो डियास यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा लिहीली आहे. प्लबिता बोरठाकूर हिनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्या जोडीला अंकुर विकल, समीधा गुरू, त्विषा सीमा, कृष्णा गोकानी आदी कलाकार आहेत.



हेही वाचा -

'असं' आहे अकरावीचं सुधारीत वेळापत्रक, ४ जुलैपर्यंत करता येईल अर्ज

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ खेळणार नव्या जर्सीत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा