फाॅलो द आॅरेंज, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ खेळणार नव्या जर्सीत

भारतीय संघातील सर्व खेळाडू भगवी जर्सी घालून रविवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध सामन्यात मैदानात उतरणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा भारतीय संघाला नव्या जर्सीत पाहायला मिळणार आहे.

  • फाॅलो द आॅरेंज,  इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ खेळणार नव्या जर्सीत
  • फाॅलो द आॅरेंज,  इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ खेळणार नव्या जर्सीत
SHARE

यंदा वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून खेळणार असल्याची चर्चा सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये सुरु होती. परंतु, भगवी जर्सी भारतीय संघ कधी घालणार याबाबत माहिती नसल्यानं चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, या संभ्रमाला बीसीसीआयनं पुर्णविराम दिला आहे. बीसीसीआयनं भगव्या जर्सीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. भारतीय संघातील सर्व खेळाडू भगवी जर्सी घालून रविवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध सामन्यात मैदानात उतरणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा भारतीय संघाला नव्या जर्सीत पाहायला मिळणार आहे.

वेगळ्या रंगाची जर्सी

इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघाची जर्सी निळ्या रंगाची असल्यानं भारताला या सामन्यात वेगळ्या रंगाच्या जर्सीनं खेळण्याचे निर्देश आयसीसीनं दिले होते. नियमानुसार, यजमान संघाची जर्सी बदलत नाही. त्यामुळं भारतीय संघाला भगव्या जर्सीमध्ये खेळावं लागणार आहे.

जर्सीचं अधिकृत अनावरण

भारतीय संघाच्या नव्या भगव्या जर्सीचं अधिकृत अनावरण करण्यात आले. नव्या जर्सीमध्ये समोरचा भाग हा निळ्या रंगाचा असून दोन्ही हात आणि पाठीमागचा संपूर्ण भाग भगव्या रंगात आहे.हेही वाचा -

'असं' आहे अकरावीचं सुधारीत वेळापत्रक, ४ जुलैपर्यंत करता येईल अर्ज

मुंबईत पुढचे ४ दिवस जोरदार पावसाचेसंबंधित विषय
ताज्या बातम्या