Advertisement

'असं' आहे अकरावीचं सुधारीत वेळापत्रक, ४ जुलैपर्यंत करता येईल अर्ज

चालू शैक्षणिक वर्षातील (२०१९-२०) अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून त्यासंदर्भातील नवं वेळापत्रक बोर्डाने जाहीर केलं आहे. त्यानुसार भाग १ आणि २ नोंदणीचा कालावधी ४ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.

'असं' आहे अकरावीचं सुधारीत वेळापत्रक, ४ जुलैपर्यंत करता येईल अर्ज
SHARES

चालू शैक्षणिक वर्षातील (२०१९-२०) अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून त्यासंदर्भातील नवं वेळापत्रक बोर्डाने जाहीर केलं आहे. त्यानुसार भाग १ आणि २ नोंदणीचा कालावधी ४ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. या प्रवेश प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातून (ओपन कॅटॅगिरी)तून आॅनलाईन अर्ज भरलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी (सामाजिक आणि शैक्षणिक प्रवर्ग) आणि ईडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) वर्गातून नव्याने अर्ज करता येतील. नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळा/ मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन अर्जात बदल करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.

जबाबदारी काॅलेजांची

सुधारीत वेळापत्रकानुसार कनिष्ठ आणि नामांकित काॅलेजांतील ७० टक्के प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काॅलेजांना नियमित वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच एकत्र वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी काॅलेजांची असेल, असं देखील शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

प्रथम प्राधान्य फेरी

ज्युनिअर काॅलेजांना त्यांच्याकडील व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यातील जागा केव्हाही समर्पित करता येतील. तर अल्पसंख्याक काॅलेजांना त्यांचा अल्पसंख्याक कोटा तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर समर्पित करता येईल. सोबतच‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरीचं वेळापत्रक उपसंचालक कार्यालयाकडून नंतर जाहीर करण्यात येईल.


'असं' आहे सुधारित वेळापत्रक

२९ जून ते ४ जुलै - सायंकाळी ५ वाजेपर्यंत

१. (सामान्य शाखेच्या कला, वाणिज्य, विज्ञान, एच. एस. व्ही. सी. शाखेसाठी - अ) - भाग १ न भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरणे.

- (ब ) भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग २ भरणे.

२. कोटा प्रवेश (व्यवस्थापन, इनहाउस, अल्पसंख्याक) कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारणे आणि कोटा प्रवेशातील गुणवत्ता याद्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात येतील. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश विहित वेळेत अपडेट करणे बंधनकारक आहे.

५ जुलै - संध्याकाळी ७ वाजता - सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.

६ व ८ जुलै - सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत - त्रुटी व हरकतींवर आक्षेप संबंधित उपसंचालक कार्यालयात नोंदविणे.


पहिली फेरी

१२ जुलै - सायंकाळी ६ वाजता - पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.

१३ जुलै - सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत - पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.

१५ जुलै व १६ जुलै - सकाळी ११ ते दुपारी ३ - पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.

१६ जुलै - सायंकाळी ७ वाजता - पहिल्या गुणवत्ता यादीची कटआॅफ व दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा जाहीर.

१७ व १८ जुलै - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे. आवश्यकता असल्यास भाग २ मध्ये बदल करणे.


दुसरी फेरी

२२ जुलै - सायंकाळी ६ वाजता - दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.

२३ जुलै - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.

२४ व २५ जुलै - सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत - दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.

२५ जुलै - सायंकाळी ७ वाजता - दुसऱ्या गुणवत्ता यादीची कटआॅफ व तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा जाहीर.

२७ व २९ जुलै - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - आवश्यकता असल्यास भाग २ मध्ये बदल करणे.


तिसरी फेरी

१ आॅगस्ट - सायंकाळी ६ वाजता - तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.

२ आॅगस्ट - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - तिसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.

३ व ५ आॅगस्ट - सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत - तिसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.

५ आॅगस्ट - सायंकाळी ७ वाजता - तिसऱ्या गुणवत्ता यादीची कटआॅफ व विशेष गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा.


विशेष गुणवत्ता यादी

६ आॅगस्ट व ७ आॅगस्ट - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - प्रवेशाचा भाग १

व भाग २ भरणे आणि आवश्यकता असल्यास भाग २ मध्ये बदल करणे.


९ आॅगस्ट - सायंकाळी ६ वाजता -

विशेष गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.

१० व १३ आॅगस्ट - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.

१४ आॅगस्ट - सकाळी ११ वाजता - उपलब्ध रिक्त जागा प्रसिद्ध करणे.



हेही वाचा-

संशोधनाला चालना, डाॅ. होमी भाभा विद्यापीठाची स्थापना

अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, मराठा विद्यार्थ्यांना करता येईल नव्याने अर्ज



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा