Advertisement

संशोधनाला चालना, डाॅ. होमी भाभा विद्यापीठाची स्थापना

राज्यात संशोधनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय उच्च शिक्षण आयोग आणि महाराष्ट्र सरकारने या विद्यापीठाची स्थापना केली आहे. या विद्यापीठाचं नाव डाॅ. होमी भाभा विद्यापीठ असून ते या वर्षीच सुरू होणार आहे.

संशोधनाला चालना, डाॅ. होमी भाभा विद्यापीठाची स्थापना
SHARES

मुंबईतील विद्यार्थ्यांना संशोधनाकरीता नवीन विद्यापीठाची भेट मिळाली आहे. राज्यात संशोधनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय उच्च शिक्षण आयोग आणि महाराष्ट्र सरकारने या विद्यापीठाची स्थापना केली आहे. या विद्यापीठाचं नाव डाॅ. होमी भाभा विद्यापीठ असून ते या वर्षीच सुरू होणार आहे. या विद्यापीठात ‘एमएससी’च्या २७२ आणि ‘पीएचडी’च्या २८९ जागांवर प्रवेश देण्यात येतील.  

‘या’ विषयांचा समावेश 

डाॅ. होमी भाभा विद्यापीठातून विद्यार्थ्यांना केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स, बाॅटनी, जीओलाॅजी, मायक्रो बायाॅलाॅजी, बायोक्रेमिस्ट्री, बायोटेक, एन्व्हायर्मेंटल सायन्स विषयांत एमएससी करता येईल. विद्यार्थ्यांना ‘एमएससी’करीता प्रवेश करण्यासाठी इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या वेबसाइटद्वारे आॅनलाईन अर्ज करता येतील.  

आॅनलाईन अर्ज

प्रवेशासंदर्भातील सर्व प्रक्रिया आॅनलाईन असेल. विद्यार्थ्यांना १५ जुलै सायंकाळी ४ वाजेपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येईल. नोंदणीची वेळ संपल्यावर १६ जुलै रोज मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. मेरिट लिस्टनंतर विद्यार्थ्यांना १८ जुलै सायंकाळ ४ वाजेपर्यंत हरकती नोंदवता येतील.  

सीईटी परीक्षा 

पर्यावरण शास्त्र विषयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागेल. त्यासाठी १७ जुलै रोजी शासकीय विज्ञान संस्थेत सकाळी ११ वाजून ३० मिनिटांला सीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. १९ जुलै रोजी अंतिम मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. पहिल्या राऊंडची काऊंन्सिलिंग आणि प्रवेश प्रक्रिया २२ जुलै सकाळी ११ वाजता सुरू होईल. तर दुसऱ्या राऊंडची काऊंन्सिलिंग २५ जुलै आणि तिसऱ्या राऊंडची काऊंन्सिलिंग २९ जुलै रोजी होईल.



हेही वाचा-

मराठा विद्यार्थ्यांना जात पडताळणीविना प्रवेश – विनोद तावडे

‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस अॅण्ड कल्चरल सेंटर’साठी ८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा