‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस अॅण्ड कल्चरल सेंटर’साठी ८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील सांस्कृतिक भवनात ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस अॅण्ड कल्चरल सेंटर’उभारण्यात येणार आहे. सांस्कृतिक भवनात उभारण्यात येणाऱ्या या सेंटरसाठी वित्त विभागानं ८ कोटी ६० लाख रूपयांचा निधी मंजुर केला आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील सांस्कृतिक भवनात ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्ट्स अॅण्ड कल्चरल सेंटर’उभारण्यात येणार आहे. सांस्कृतिक भवनात उभारण्यात येणाऱ्या या सेंटरसाठी वित्त विभागानं ८ कोटी ६० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या गॅलरीत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य कलादालन उभारण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळं तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दिलेल्या मंजुरीमुळं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत याबाबत घोषणा केली.

कुलगुरूंसमवेत बैठका

विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक संकुलास ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्ट्स अॅण्ड कल्चरल सेंटर’ असं नाव देण्याची सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली होती. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातील चित्रकारांना आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवता यावं, यासाठी विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्ट्स गॅलरी’ उभारण्यासाठी राज्यमंत्री वायकर यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमवेत बैठका घेतल्या होत्या.

सांस्कृतिक भवन

जहांगीर आर्ट्स गॅलरीच्या धर्तीवरच परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असणारी भव्य गॅलरी उभारण्यात येणार आहे. कलिना येथील या सांस्कृतिक भवनात लोककला अकादमी, संगीत अकादमी, शाहीर अमरशेख अध्यासन, लोकशाहीर पठ्ठे बापुराव कलादालनही प्रस्तावित आहेत. या सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्ती, नुतनीकरण, सौंदर्यीकरणासह आर्ट्स आणि कल्चरल सेंटर स्थापित करण्यासाठी विद्यापीठाच्या मदतीनं प्रस्ताव तयार करुन तो वित्त विभागाकडं पाठविण्यात आला होता.

अर्थसंकल्पीय चर्चा

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्यात आली होती. त्यांनीही या कामासाठी आवश्यक असलेल्या ८ कोटी ५९ लाख ४७ हजार ४५५ इतक्या निधीला मंजुरी दिली. त्यानुसार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना ‘मा. बाळासाहेब ठाकरे आर्ट्स गॅलरी’ उभारण्याबरोबरच अन्य कामांसाठीच्या आवश्यक निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती विधानसभेत दिली.हेही वाचा -

प्रवशांच्या सुरक्षेसाठी चर्चगेट इमारतीवरील महात्मा गांधी यांचं चित्र हटवणार

तांत्रिक बिघाडामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीतसंबंधित विषय