तांत्रिक बिघाडामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

गोरेगाव ते जोगेश्वरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या तांत्रिक बिघाडामुळं वाहतूक २५ ते ३० मिनिटं उशिरानं सुरू आहे.

SHARE

गोरेगाव ते जोगेश्वरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या तांत्रिक बिघाडामुळं वाहतूक २५ ते ३० मिनिटं उशिरानं सुरू आहे. मात्र, बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बिघाडाची दखल

गोरेगाव ते जोगेश्वरी स्थानकादरम्यान झालेल्या या बिघाडाची पश्चिम रेल्वे प्रशासनानं दखल घेतली अाहे. तसंच, दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. परंतु, या बिघाडामुळं पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांवर प्रवाशांची गर्दी जमली होती.  

छताची काम

सध्या मुंबईत मान्सून दाखल झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, काही स्थानकांवरील छताची काम सुरु आहेत. त्यामुळं प्रवाशांची गैर सोय होत अाहे. त्याशिवाय वाहतूक विस्कळीत होण्यामुळं प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली.  हेही वाचा -

एकदम 'बेस्ट', बसचं किमान भाडं ८ रुपयांऐवजी ५ रुपयेसंबंधित विषय
ताज्या बातम्या