Advertisement

एकदम 'बेस्ट', बसचं किमान भाडं ८ रुपयांऐवजी ५ रुपये

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमानं प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे.

SHARES

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमानं प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे. त्यामुळं या प्रस्तावानुसार, आता ५ किलोमीटर अंतरासाठी किमान भाडं ५ रुपये निश्चित करण्यात आलं आहे. एसी बसच्या पहिल्या टप्प्यासाठीही केवळ ६ रुपये तिकीट आकारलं जाणार आहे. सध्यस्थितीत या प्रस्तावाची अंमलबजावणी कधीपासून करणार याची माहिती मिळालेली नाही. मात्र, बेस्टच्या या निर्णयामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.



नवे तिकीट दर

नव्या प्रस्तावानुसार ५ किमीपर्यंतच्या प्रवासासाठी ५ रुपये तिकीट असणार आहे. १० किमी प्रवासासाठी १० रुपये, १५ किमीपर्यंत प्रवासासाठी १५ रुपये आणि १५ किमीपुढील प्रवासासाठी २० रुपये तिकीट असणार आहे. दैनंदिन पासचे दर ५० रुपये असणार आहेत.

एसी बसचं तिकीटही स्वस्त

एसी बसचं तिकीट दरही आता स्वस्त करण्यात आले आहे. एसी बसचं तिकीट ५ किमीपर्यंत प्रवासासाठी ६ रुपये असणार आहे. १० किमीसाठी १३ रुपये, १५ किमीसाठी १९ रुपये आणि १५ किमीपुढील अंतरासाठी २५ रुपये असणार आहे. एसी बसचा दैनंदिन पास ६० रुपये असणार आहे.

५३० नवीन बसगाड्या

बेस्ट बसच्या दर कपातीच्या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून, आता हा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर, महापालिकेत मंजुरी मिळताच, ही किमान भाडे आकारणी नव्या दरानं लागू होणार आहे. महापालिका महासभेची बैठक २७ जून रोजी असून, बेस्ट भाडेकपातीचा प्रस्ताव मंजुरीसाठी या बैठकीत मांडण्याच येणार आहे. महापालिकेत मंजूर झाल्यानंतर आरटीओकडं आणि त्यानंतर नवीन दर अंमलात येतील, असं बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी सांगितलं. तसेच, बेस्ट प्रवाशांसाठी ५३० नवीन बसगाड्यांची ऑर्डर बेस्ट उपक्रमानं दिली आहे. सध्या, बेस्टचा प्रवाशी वर्ग दैनिक २२ लाख एवढा आहे. ही संख्या ४० लाखांवर नेण्याचं बेस्ट उपक्रमाचं लक्ष्य आहे, असंही बागडे यांनी म्हटलं.



हेही वाचा -

मेहुल चोक्सीची नागरिकता होणार रद्द, अँटिग्वा सरकारची घोषणा

अभिजीत बिचुकले बिग बाॅसच्या घरात परतणार?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा