अभिजीत बिचुकले बिग बाॅसच्या घरात परतणार?

बिचुकलेविरोधातील तक्रार पठाण यांनी स्वत:हून मागे घेत असल्याचं न्यायालयात लिहून दिलं आहे. त्यामुळे बिचुकले तुरूंगातून बाहेर येत पुन्हा एकदा बिग बाॅसच्या घरात परतण्याची शक्यता आहे.

अभिजीत बिचुकले बिग बाॅसच्या घरात परतणार?
SHARES

बिग बाॅस मराठी या रिअॅलिटी शो मधील स्पर्धक अभिजीत बिचुकले याला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी चेक बाऊन्स तसंच खंडणी प्रकरणी बिग बाॅसच्या सेटवरून अटक केली होती. यापैकी तक्रारदाराने खंडणीची तक्रार मागे घेतल्याने बिचुकले पुन्हा एकदा बिग बाॅसच्या घरात एन्ट्री घेण्याची शक्यता आहे.  

सेटवरूनच अटक

चेक बाऊन्स प्रकरणात सातारा न्यायालयाने काही दिवसांपूर्वी बिचुकलेविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर सातारा पोलीस मुंबईत दाखल झाले. बिचकुले बिग बाॅसचा स्पर्धक असल्याने तसंच या शो चा सेट गोरेगाव फिल्म सिटी इथं असल्याने सातारा पोलिसांनी आरे पोलिसांची मदत घेत २१ जून रोजी बिचकुलेला बिग बॉसच्या घरातून अटक केली होती.

तुरूंगात रवानगी

शनिवारी त्याला सातारा न्यायालयात हजर केलं असता चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. मात्र २०१२ मधील खंडणी प्रकरणात जामीन फेटाळल्याने त्याची रवानगी सातारा जिल्हा तुरूंगात करण्यात आली होती.

तक्रार मागे

बिचुकले विरोधात फिरोज पठाण यांनी खंडणीची तक्रार दाखल केली होती. परंतु बिचुकलेविरोधातील तक्रार पठाण यांनी स्वत:हून मागे घेत असल्याचं न्यायालयात लिहून दिलं आहे. त्यामुळे बिचुकले तुरूंगातून बाहेर येत पुन्हा एकदा बिग बाॅसच्या घरात परतण्याची शक्यता आहे.

बिचुकलेमुळे साताऱ्याची शान वाढली आहे. बिग बाॅसच्या घरातील त्याचा खेळ पाहून तो नक्कीच जिंकेल अशी आशा असल्याचं, ' पठाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. हेही वाचा-

अभिजीत बिचकुलेचा जामीन फेटाळला, आणखी काही दिवस राहावं लागणार तुरूंगात

बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटकसंबंधित विषय