Advertisement

प्रवशांच्या सुरक्षेसाठी चर्चगेट इमारतीवरील महात्मा गांधी यांचं चित्र हटवणार

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट इमारतीवरील महात्म गांधी यांचं चित्र काढण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. चर्चगेट इमारतीवर २५ लाख रुपये खर्च करून हे चित्र काढण्यात आलं होतं.

प्रवशांच्या सुरक्षेसाठी चर्चगेट इमारतीवरील महात्मा गांधी यांचं चित्र हटवणार
SHARES

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट इमारतीवरील महात्म गांधी यांचं चित्र काढण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. चर्चगेट इमारतीवर २५ लाख रुपये खर्च करून हे चित्र काढण्यात आलं होतं. मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. तसंच, मागील काही दिवसांपूर्वी याच गांधींचं चित्र काढलेलं अॅल्युमिनिअम फसाड कोसळून दुर्घटना घडली होती. त्यामुळं पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आणि मान्सूनच्या धर्तीवर प्रवासी सुरक्षिततेसाठी हे अॅल्युमिनिअम फसाड काढण्यात येणार आहे.

प्रवाशाचा मृत्यू

१२ जून रोजी या फसाडचे ६ भाग निखळल्यानं मधुकर नार्वेकर या पादचारी प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेनं त्रिसदस्यीस समितीची नियुक्ती केली होती. स्थानकाच्या इमारतीवरील फसाडची जोडणी कमकुवत झाली असल्यानं वादळी वारे आल्यास अन्य फसाडचे भाग देखील कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं दुर्घटना टाळण्यासाठी हे फसाड काढण्याची शिफारस मुख्यालयाला करण्यात आल्याचं समजतं.

अॅल्युमिनिअम फसाड

स्थानक सुशोभिकरण उपक्रमांतर्गत सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून हे चित्र रेखाटण्यात आलं होतं. चर्चगेट स्थानकाच्या इमारतीवर अॅल्युमिनिअम फसाडवर महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटण्याला रेल्वे अधिकाऱ्यांनीच विरोध केला होता. मात्र पश्चिम रेल्वेनं आग्रह धरत हे चित्र काढलं होत.हेही वाचा -

तांत्रिक बिघाडामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईतील एचआर, जयहिंद, केसी कॉलेजमधील प्रवेश घोटाळ्याची चौकशी करणार- शेलारRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा