मुंबईत पुढचे ४ दिवस जोरदार पावसाचे

शुक्रवारी सुरूवात झालेल्या पावसाचा शनिवारी दुसरा दिवस असून हवामान विभागानं पुढील ४ दिवस पाऊस पडणार जोरदार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

SHARE

मुंबईत शुक्रवारपासून जोरदार पावासानं हजेरी लावल्यानं अनेक मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या पहिल्याच पावसानं मुंबईकरांचे प्रचंड हाल केले. शुक्रवारी सुरूवात झालेल्या पावसाचा शनिवारी दुसरा दिवस असून हवामान विभागानं पुढील ४ दिवस पाऊस पडणार जोरदार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईसह उपनगरात आणि कोकणात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जास्त पाऊस

अरबी समुद्रात हवेचा दाब वाढला आहे. त्यामुळं कोकणच्या आजुबाजूच्या भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील ४ दिलस, मुंबईसह ठाणे आणि इतर भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

समुद्र किनाऱ्यावर गर्दी

हवामान विभागानं पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवल्यानं मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र विकेंड असल्यामुळं अनेक मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली आहे.हेही वाचा -

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, अनेक गाड्यांचं नुकसानसंबंधित विषय
ताज्या बातम्या