Advertisement

बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी असे दिसायचे तुमचे फेव्हरेट सेलिब्रिटी


बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी असे दिसायचे तुमचे फेव्हरेट सेलिब्रिटी
SHARES

बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वच सेलिब्रिटी प्रचंड मेहनत घेत असतात. मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर आज अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण हेच सेलिब्रिटी कधीकाळी सर्व सामान्यांसारखे आयुष्य जगायचे. पण बॉलिवूडमध्ये येताच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पण सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. स्ट्रगलिंगच्या काळात खूप क्वचीतच त्यांना कुणी ओळखत असावे. त्यांचे जुने आणि नवीन फोटो पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल. पण काळानुसार बदलाव हा होतोच. या सेलिब्रिटिंच्या लाइफस्टाइल, राहणीमान आणि पेहरावात देखील प्रचंड बदलाव आला. आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटिंची ओळख करून देणार आहोत जे आज बॉलिवूडमध्ये यशस्वी आहेत. त्यांच्या राहणीमानापासून ते लाइफस्टाइलमध्ये तुम्हाला आता जमीन-आसमानचा फरक आढळेल.


करिष्मा कपूर

१९९१ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या करिष्मानं लग्नानंतर बॉलिवूडला टाटा बाय केला. पण आजही तिचे चित्रपट आणि तिनं साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. १९९१ साली करिष्मानं 'प्रेम कैदी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपट केले. पण पाहिजे तसे यश तिच्या पदरी पडले नाही. पण 'राजा हिंदुस्थानी' चित्रपट तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपाटतील भूमिकेसाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर देण्यात आला. त्यानंतर तिची यशस्वी घौडदौड अशीच सुरू राहिली.  


करिना कपूर

'रेफ्युजी' या चित्रपटाद्वारे करिनानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'मुझे कुछ कहेना है' (२൦൦१) आणि 'कभी खुशी कभी गम' (२൦൦१) या चित्रपटांमुळे तिला व्यावसायिक यश प्राप्त झाले. 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील तिच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक देखील केलं. त्यानंतर करिनानं अनेक चित्रपट केले. पण ते अयशस्वी ठरले. पण २൦൦४ मध्ये आलेला चित्रपट 'चमेली' तिच्या कारकिर्दीला वळण देणारा ठरला. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर मिळाला. त्यानंतर २൦൦७ साली 'जब वी मेट' चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आज करिनानं आघाडीच्या अभिनेत्र्यांमध्ये स्थान पटकावले आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी करिना कपूर एवढी मेंटेन नव्हती. पण नंतर झिरो साईज फिगर मिळवण्यासाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली.


परिनीती चोप्रा

परिनीती चोप्रानं इंग्लंडच्या मँचेस्टर विद्यापीठातून व्यापार, अर्थ आणि वाणिज्य अशी तिहेरी पदवी संपादित केली आहे. पण पुढे परिणीतीनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला.२൦११ मध्ये परिणीतीनं 'लेडीज vs रिक्की बहल' चित्रपटात सह नायिकेची भूमिका करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २൦१२ साली 'इश्कजादे' या चित्रपटामधील भूमिकेसाठी परिणीतील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी परिणीतीचं राहणीमान साधं होतं. पण नुकताच तिनं स्वत:चा मेकओव्हर केला. आता ती एकदम फिट आणि आणखी सुंदर दिसत आहे.


जॉन इब्राहिम

जॉन इब्राहिमनं जाहिरात आणि मॉडलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानं अनेक म्युझिक व्हिडिओजमध्ये देखील काम केलं. २൦൦३ मध्ये त्यानं 'जिस्म' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात जॉनची माचो बॉडी नव्हती. पण बदलत्या काळानुसार जॉनमध्ये प्रचंड सुधारणा झाली. २൦൦४ साली 'धूम' चित्रपटातील नकारात्मक भूमिका त्याच्या करिअरसाठी फायदेशीर ठरली. त्यानंतर अनेक चित्रपटात त्यानं काम केलं. फक्त चित्रपटात कामच नाही तर त्यानं दोन चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.


आलिया भट

आलियानं २൦१२ साली प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली. चित्रपटात येण्यापूर्वी आलिया फॅट होती. पण बॉलिवूडमध्ये तिनं फॅट टू फिट असा प्रवास केला आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिनं 'टू स्टेट', 'हायवे', 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया' आणि 'उडता पंजाब' या चित्रपटात उल्लेखनीय काम केलं. 'उडता पंजाब'साठी आलियाला फिल्मफेअरचा सर्वोत्तम पुरस्कार मिळाला.


रणवीर सिंग

हा फोटो पाहून तुम्हाला विश्वास नसेल बसत की हा रणवीर सिंह आहे. पण फोटोत दिसणारा हा तरूण रणवीर सिंहच आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आणि आत्ताचा रणवीर यात किती फरक आहे. २൦१൦ साली 'बँड, बाजा और बारात' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्यानं ऑडिशन दिलं होतं. या ऑडिशनमधून त्याची निवड करण्यात आली. 'लुटेरा' आणि 'राम-लीला' चित्रपटानंतर त्याला बॉलिवूडमध्ये खरं यश मिळालं. त्यानंतर त्यानं अनेक चित्रपटात काम केलं. आज रणवीरचं नाव आघाडीच्या सेलिब्रिटींमध्ये घेतलं जातं. स्टाइल आयकॉन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बिअर्ड लूक ही स्टाइल रणवीर सिंहनंच प्रचलित केली. यानंतरच तरूणांनी ही स्टाईल फॉलो करायला सुरुवात केली.हेही वाचा

दीपिकाचा हॉट अँड सेक्सी अंदाज


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा