Advertisement

लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार
SHARES

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान ४ वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये एक प्रकारची न भरून निघणारी पोकळी निर्माण असल्याची भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती. अशा आशयाचे ट्विट करत लता दीदींच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. लता दीदींच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

लतादीदींचं पार्थिव विशेष लष्करी वाहनातून शिवाजी पार्क इथं आणलं जाणार आहे. पेडर रोड वरील प्रभू कुंज निवास्थान, महालक्ष्मी कँडबरी जंक्शन, हाजी अली जंक्शन, हाजी अली सी फेस रोड, वरळी अँट्रीया माँल, वरळी नाका, पोद्दार हाँस्पिटल, दूरदर्शन सिग्नल, वरळीकर चौक, सिद्धीविनायक मंदीर, इंदू मील, चैत्यभूमी सिग्नल, छत्रपती शिवाजी महाराज मैदान असा प्रवास असेल.

दरम्यान, लता दीदींच्या निवासस्थानी सेलिब्रिटींसह राजकीय नेते, क्रिकेट जगतातील अनेकांनी हजेरी लावली. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, आशा पारेख, सुरेश वाडकर, जावेद अख्तर, अनुपम खेर यांसह अनेक मान्यवर दीदींच्या अंत्यदर्शनासाठी प्रभूकुंज येथे उपस्थित आहेत. दीदींचे निवासस्थान असलेला पेडर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.



हेही वाचा

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

अमिताभ बच्चन यांनी घेतलं लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा