Advertisement

माहीची 'ठाकूरगंज फॅमिली' पाहिली का?

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या एका अशा फॅमिलीची चर्चा आहे, ज्यात नामवंत कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. माही गिलची मुख्य भूमिका असलेल्या 'फॅमिली आॅफ ठाकूरगंज' या चित्रपटात ही अनोखी फॅमिली पहायला मिळणार आहे.

माहीची 'ठाकूरगंज फॅमिली' पाहिली का?
SHARES

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या एका अशा फॅमिलीची चर्चा आहे, ज्यात नामवंत कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. माही गिलची मुख्य भूमिका असलेल्या 'फॅमिली आॅफ ठाकूरगंज' या चित्रपटात ही अनोखी फॅमिली पहायला मिळणार आहे.


व्यक्तिरेखांची पुण्याई

काही कलाकार नेहमीच काहीशा हटके भूमिका साकारत असतात. त्यामुळंच त्यांची भूमिका असलेले चित्रपट जेव्हा येतात, तेव्हा त्या चित्रपटांना कोणत्याही पब्लिसिटी स्टंटची गरज भासत नाही, तर ते चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आपोआपच गर्दी करतात. आजच्या काळातील अशा कलाकारांपैकी एक आहे माही गिल. माहीच्या केवळ नावातच प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणण्याची ताकद आहे. यामागं आहे तिनं यापूर्वी साकारलेल्या व्यक्तिरेखांची पुण्याई. या पुण्याईच्या बळावरच माहीनं 'फॅमिली आॅफ ठाकूरगंज'कडं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


पोस्टर लाँच

'फॅमिली आॅफ ठाकूरगंज' या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. 'जरा संभाल के जल्द आ रहे है' या टॅगलाईनसह प्रदर्शित करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये एखाद्या निवडणूकीला उभी असलेल्या उमेदवाराप्रमाणे माही हात जोडलेली दिसते. दुसऱ्या बाजूला डोळ्यांना गॅागल लावून जिमी शेरगिलही हात जोडलेल्या पोझमध्ये चमकला आहे. या दोघांच्या मध्ये सौरभ शुक्ला मिशीवर ताव देत एखाद्या भाईप्रमाणं उभे आहेत. पोस्टरच्या खालच्या बाजूला मराठमोळी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा स्माइली लुक देत लक्ष वेधून घेतो, तर दुसऱ्या बाजूला नंदिश सिंग आहे.


१९ जुलै रोजी प्रदर्शित

या चित्रपटाची कथा कौटुंबिक नितीमूल्यांवर आधारित असल्याचं समजतं. यात कुटुंब, संस्कृती आणि रीतीरिवाजांसोबतच इतरही बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटाचं बरंचसं शूटिंग लखनऊमध्ये करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनोज के. झा यांनी केलं असून, हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मुकेश तिवारी, सुधीर पांडे, पवन मल्होत्रा, यशपाल शर्मा, नंदिश संधू, राज झुत्शी, प्रणती राय प्रकाश, सलील आचार्य, शिवीका ऋषी आदी कलाकारांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाचं लेखन दिलीप शुक्ला यांनी केलं असून, सिनेमॅटोग्राफी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर योगेश जानी यांनी केली आहे.



हेही वाचा -

सूत्रसंचालिका बनून 'आऊट' करणार पर्ण पेठे

'टकाटक'ची तीन दिवसांत तीन कोटींहून अधिक कमाई




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा