Advertisement

'टकाटक'ची तीन दिवसांत तीन कोटींहून अधिक कमाई

प्रेक्षकांना कधी काय आवडेल याचा नेम नाही. ठराविक अंतरानं याची प्रचिती येतच असते. मागच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'टकाटक' या मराठी चित्रपटानंही पहिल्या तीन दिवसांमध्ये तीन कोटींहून अधिक रुपयांची कमाई करत हे सिद्ध केलं आहे.

'टकाटक'ची तीन दिवसांत तीन कोटींहून अधिक कमाई
SHARES

प्रेक्षकांना कधी काय आवडेल याचा नेम नाही. ठराविक अंतरानं याची प्रचिती येतच असते. मागच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'टकाटक' या मराठी चित्रपटानंही पहिल्या ३ दिवसांमध्ये ३ कोटींहून अधिक रुपयांची कमाई करत हे सिद्ध केलं आहे.

सुखद धक्का

'टाइमपास' फेम प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्री यांची मुख्य भूमिका असलेल्या दिग्दर्शक मिलिंद कवडेचा 'टकाटक' हा मराठी चित्रपट सेक्स कॅामेडी पठडीत मोडणारा आहे. त्यामुळं हा चित्रपट बॅाक्स आॅफिसवर कशा प्रकारे व्यवसाय करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. थोडी धाकधुक लावलेल्या या चित्रपटानं पहिल्या दिवसापासूनच आश्चर्यकारक बिझनेस करत 'टकाटक' निर्मात्यांसह मराठी चित्रपटसृष्टीला सुखद धक्का दिला. मागील सहा महिन्यांपासून ज्या व्यवसायाच्या प्रतीक्षेत मराठी चित्रपटसृष्टी होती तो करण्याच्या दिशेनं 'टकाटक'नं वाटचाल सुरू केली आहे.

सेक्स कॉमेडी

मराठीत प्रथमच सेक्स कॉमेडी हा प्रकार हाताळण्यात आल्यानं 'टकाटक' या चित्रपटाच्या कुतूहलापोटी शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फर्स्ट शोपासूनच प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी गर्दा केल्याचं चित्र महाराष्ट्रभर पहायला मिळालं. या बळावरच 'टकाटक'नं तीन दिवसांमध्ये एकूण ३ कोटी ५ लाखांचा गल्ला जमवला आहे. प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असून, तरूणाई या चित्रपटाला 'टकाटक' रिस्पाँस देत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत आलेला नवा ट्रेंड आवडल्याची जणू पोचपावतीच दिली आहे. 

कंटेंट खूप महत्त्वाचा

चित्रपटाची भाषा जरी बोल्ड असली तरी त्यातील कंटेंट खूप महत्त्वाचा असल्याचं तरूणाईचं म्हणणं आहे. मूळात 'टकाटक'चं बोल्ड असणं ही कथेचीच गरज असून, यातील भाषा, शैली आणि एकूणच वातावरण युथफुल असल्याचंही कॉलेज वर्गातील प्रेक्षकांचं म्हणणं आहे. हा चित्रपट वरकरणी जरी बोल्ड वाटत असला तरी यात धमाल, मजा, मस्ती आहे. आज आपल्या आजूबाजूला काय घडत आहे? कशा प्रकारचं वातावरण आहे? त्याची हाताळणी कशाप्रकारे करणं गरजेचं आहे? याचं चित्रण 'टकाटक'मध्ये पहायला मिळत आहे, त्यामुळं एकूणच हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं एक परीपूर्ण पॅकेजच असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

जोडीची केमिस्ट्री

प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्री या मुख्य भूमिकेतील जोडीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावत आहे. अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव या आणखी एका नव्या कोऱ्या जोडीची धम्मालही अनुभवायला मिळते. त्यांच्या जोडीला भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी दमदार कलाकारांच्या अभिनयाची टकाटक फोडणी 'टकाटक'ला एका वेगळ्याच उंचीवर नेण्यास कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया मिळाली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाला ४५० पेक्षा अधिक थिएटर्स तसंच आठवडयाला ६००० पेक्षा अधिक शोज मिळाले आहेत.



हेही वाचा -

बिग बॉसच्या घरातील सदस्यांची का झाली पळापळ?

सिद्धार्थ-परिणीतीचा 'जबरिया' ट्रेलर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा