सिद्धार्थ-परिणीतीचा 'जबरिया' ट्रेलर

प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर लवकरच एक अशी जोडी पहायला मिळणार आहे, जी यापूर्वीही एकत्र आलेली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परीणिती चोप्रा या जोडीचा 'जबरिया जोडी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

SHARE

प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर लवकरच एक अशी जोडी पहायला मिळणार आहे, जी यापूर्वीही एकत्र आलेली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परीणिती चोप्रा या जोडीचा 'जबरिया जोडी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 


पकडवा शादी

'पकडवा शादी'सारख्या अनोख्या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ-परीणितीची जोडी पहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बिहारसारख्या काही ठिकाणी पकडवा शादीसारखा लग्नाचा प्रकार प्रचलित आहे. या चित्रपटाची कथा याच विषयावर आधारित आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक विनील मॅथ्यू यांच्या 'हंसी तो फंसी' या चित्रपटानंतर सिद्धार्थ-परीणिती पुन्हा एकदा यांची जोडी जमली आहे. 'हंसी तो फंसी'मध्ये फार कमाल दाखवू न शकलेली ही जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. 


कथा प्रथेवर आधारित

'जबरीया जोडी' या चित्रपटाची कथा वास्तव जीवनातील एका प्रथेवर आधारित आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमधील काही ठिकाणी आजही ही प्रथा प्रचलित आहे. यानुसार लग्नासाठी योग्य असलेल्या तरुणाचं वधूच्या कुटुंबियांकडून अपहरण केलं जातं. हुंडा देण्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्या तरुणाला लग्नासाठी जबरदस्ती तयार केलं जातं. ही प्रथा फार पूर्वीपासून सुरू आहे. 'जबरीया जोडी' या चित्रपटात अशाच जबरदस्ती जोडी जमवणारी कथा पहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ गावठी तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. जबरदस्ती जोडी जमवणाऱ्या तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.


२ आॅगस्ट रोजी प्रदर्शित

ट्रेलरची संकल्पना सुरेख असून, त्यातील विनोदी संवाद 'जबरिया जोडी'बाबतची उत्सुकता वाढवण्यासाठी पुरेसे आहेत. सिद्धार्थ-परीणितीसोबतच जावेद जाफरी, अपारशक्ती खुराना, संजय मिश्रा, चंदन रॅाय सान्याल यांसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या अभिनयाची झलकही ट्रेलरमध्ये पहायला मिळते. उत्तर प्रदेशमधील रिअल लोकेशन्सवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. २ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत सिंग यांनी केलं असून, शोभा कपूर, एकता कपूर आणि शैलेश सिंह द्वारा यांनी बालाजी टेलीफिल्म्स आणि कर्मा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  

लिंक - https://youtu.be/SXAqEbLJYPYहेही वाचा -

कार्तिकसोबत हिमाचल प्रदेशात काय करतेय सारा?
संबंधित विषय
ताज्या बातम्या