Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,72,781
Recovered:
57,19,457
Deaths:
1,17,961
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,809
733
Maharashtra
1,32,241
9,361

सूत्रसंचालिका बनून 'आऊट' करणार पर्ण पेठे

सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू असल्यानं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. छोट्या पडद्यावरही विनोदांच्या चौकार-षटकारांची आतषबाजी सुरू होणार असून यात अभिनेत्री पर्ण पेठे सूत्रसंचालिकेच्या रूपात 'एक टप्पा आऊट' करत विकेट काढणार आहे.

सूत्रसंचालिका बनून 'आऊट' करणार पर्ण पेठे
SHARES

सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू असल्यानं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. छोट्या पडद्यावरही विनोदांच्या चौकार-षटकारांची आतषबाजी सुरू होणार असून यात अभिनेत्री पर्ण पेठे सूत्रसंचालिकेच्या रूपात 'एक टप्पा आऊट' करत विकेट काढणार आहे.

दमदार अभिनय

पर्ण पेठे हे नाव आजच्या तरुणाईसाठी नवं नाही. मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासूनच दमदार अभिनय करणाऱ्या पर्णनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. करियरच्या सुरुवातीला ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या जोडीला दुहेरी भूमिकाही यशस्वीपणे साकारणारी पर्ण आता एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'एक टप्पा आऊट' या शोच्या माध्यमातून आता ती सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत भेटणार आहे. या शोच्या निमित्तानं पर्ण छोट्या पडद्यावरही प्रथमच झळकणार आहे.

५ जुलैपासून सुरू

'एक टप्पा आऊट' हा नवा कॅामेडी शो ५ जुलैपासून स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पर्णनं याआधी सिनेमांसोबतच प्रायोगिक नाटकांमध्येही अभिनय केला आहे. प्रथमच टेलिव्हिजन काम करण्याच्या अनुभवाविषयी ती म्हणाली की, या शोच्या निमित्तानं माझं टेलिव्हिजनवर पदार्पण होत असून, बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होत आहे. कॉमेडी हा माझा प्रांत नाही, पण या मंचावर खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. आमचे तिनही जजेस आणि मेण्टॉर्स विनोद कोळून प्यायले आहेत. त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. स्पर्धकांची एनर्जीही भन्नाट आहे. ते ज्या मेहनतीने परफॉर्मन्सची तयारी करतात ते कौतुकास्पद आहे. 'एक टप्पा आऊट' हा कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी समृद्ध करणारा अनुभव आहे.

खूपच ग्लॅमरस लूक

आजवर कथानकातील व्यक्तिरेखा साकारणाऱ्या पर्णचं खरं रूप सूत्रसंचालन करताना पहायला मिळणार आहे. सूत्रसंचालनातील वेगळेपणासोबतच यातील लुकबाबत ती म्हणाली की, खरं तर होस्ट हा स्पर्धक आणि प्रेक्षकांमधला दुवा असतो असं मला वाटतं. त्यामुळं बोलीभाषेत संवाद साधण्याचा मी प्रयत्न करत आहे. आजची तरुण पीढी ज्या भाषेत एकमेकांशी संवाद साधते अगदी तशाच पद्धतीच्या भाषेत मी संवाद साधणार आहे. या शोसाठी नेहा चौधरीनं माझा लूक डिझाईन केला आहे. खूपच ग्लॅमरस लूक आहे. दर आठवड्याला लूक्सच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करायला मिळत आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांसमोर वेगळ्या अंदाजात यायला मिळणार याचा आनंद आहे.

मातब्बर कलाकार

या शोमध्ये जॉनी लीवर, निर्मिती सावंत, भरत जाधव हे विनोद विश्वातील मातब्बर कलाकार जजच्या भूमिकेत आहेत. या जजेसविषयी पर्ण म्हणाली की, 'एक टप्पा आऊट'चे तीनही जजेस म्हणजे उत्साहाचा अखंड झरा आहेत. सिनेमा, नाटक आणि टीव्हीचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तिघंही जेव्हा सेटवर येतात, तेव्हा सेटवरचं वातावरणच बदलून जातं. कर्तुत्वानं ही माणसं कितीही मोठी असली तरी त्यांच्यातला साधेपणा सर्वांनाच भावतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्पर्धक रेशम टिपणीस, अभिजीत चव्हाण, विजय पटवर्धन, आरती सोळंकी या मेण्टॉर्सच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत.हेही वाचा -

कार्तिकसोबत हिमाचल प्रदेशात काय करतेय सारा?

सिद्धार्थ-परिणीतीचा 'जबरिया' ट्रेलरसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा