Advertisement

प्रभास-दिपिकाच्या सिनेमात अमिताभची एण्ट्री!

दिपिका-प्रभाससोबत बिग बींची एण्ट्री या बिग बजेट चित्रपटात झाल्यानं आता चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रभास-दिपिकाच्या सिनेमात अमिताभची एण्ट्री!
SHARES

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नाग अश्विन दिग्दर्शित आगामी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण यांची जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. बिग बींची एण्ट्री या बिग बजेट चित्रपटात झाल्यानं आता चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर टीझर पोस्ट करत प्रभासनं बिग बींसोबत काम करण्याविषयी आनंद व्यक्त केला. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्ताच आहे.  महानायक अमिताभ बच्चन सरांसोबत काम करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होत असल्याचं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं आहे. तर याआधी ‘पिकू’ चित्रपटात बिग बींसोबत दीपिकानं काम केलं होतं.

दिग्दर्शक नाग अश्विन यांचा असा विश्वास आहे की, "मी स्वत: ला भाग्यवान समजतो की बच्चन सरांनी अनेक चित्रपटांमधून आमच्या चित्रपटाची निवड केली." २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

हॉरर-कॉमेडितून अक्षयची दमदार एंट्री, लक्ष्मी बाँबचा ट्रेलर प्रदर्शित

अनुराग कश्यपवर आरोप करणाऱ्या पायल घोषच्या अडचणीत वाढ होणार?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा