Advertisement

मादाम तुसॉमध्ये प्रियांकाचा चौकार

लंडनमधील मादाम तुसॅाचे चार बहुमान पटकावणारी प्रियांका एकमेव ग्लोबल आयकॅान बनली आहे.

मादाम तुसॉमध्ये प्रियांकाचा चौकार
SHARES

अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या कारकिर्दीत प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक टाकलं आहे. मिळालेल्या संधीचा अचूक फायदा उठवत आणि भविष्यातील गणितं नीट जुळवत ती नुकतीच विवाहबद्धही झाली आहे. लंडनमधील मादाम तुसॅाचे चार बहुमान पटकावणारी प्रियांका एकमेव ग्लोबल आयकॅान बनली आहे.


विक्रमी प्रियांका

प्रियांकाच्या चाहत्यांसाठी ही आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आपण खऱ्या अर्थाने गेम चेंजर असल्याचं प्रियांकानं वारंवार आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे. स्टारडमची व्याख्याच बदलत तिनं अनेक गोष्टींचा पायंडा पाडण्याचा मान मिळवला आहे. हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी पहिली भारतीय, जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारी सुपरस्टार, अमेरिकन व्होगसह इतर तीस आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रथमच झळकणं असे बरेच विक्रम प्रियांकाच्या नावावर आहेत.


एकमेव ग्लोबल आयकॉन

प्रियांकाने जगातील काही आयकॉनिक मनोरंजनाची व्यासपीठं आणि लोकप्रिय टॉक शोजवर हजेरी लावली आहे. तसंच जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली महिलांमध्ये तिचा कायम उल्लेख केला जातो. मादाम तुसॉमध्ये चार पुतळ्यांचा बहुमान मिळवणारी प्रियांका ही एकमेव ग्लोबल आयकॉन बनल्याचा तिच्या चाहत्यांना अभिमान वाटेल यात शंका नाही. आजवर तिच्या जवळपास जाणारी फक्त एकच सेलिब्रिटी आहे, ती म्हणजे तीन पुतळे असलेली व्हीटने ह्युस्टन.


प्रियांकाला वेडिंग रिंगही

प्रियांकाने नुकतंच तिच्या नवीन शहरात म्हणजे न्यू यॉर्कमध्ये मादाम तुसॉमधील तिच्या पुतळ्याचं अनावरण केलं. मादाम तुसॉच्या इतिहासात प्रथमच असे होत असून यावर्षी तिचे लंडन, सिडनी आणि आशियात पुतळ्याचंही अनावरण होणार आहे. फॅशन आयकॉन असलेल्या या व्होग कव्हर स्टारने मादाम तुसॉच्या कलाकारांसोबत बारकाईने लक्ष देत काम केलं. जेसन वूने डिझाईन केलेल्या गाऊनमधील तिच्या एमी पुरस्काराचा आयकॉनिक लूक या पुतळ्यावर मेणबद्ध करण्यात आला आहे. तसेच व्हॅलेंटाइन्स डे जवळ असल्याने, प्रियांकाच्या या पुतळ्यावर तिच्या वेडिंग रिंगचीही हुबेहूब मेणाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे.



हेही वाचा -

मासे खाणं सोनू निगमला पडलं महागात

‘ठाकरे २’चा दिग्दर्शक अभिजीत (पा) नसे?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा