Advertisement

जॅकलीन म्हणते 'माझं बॉलिवूडमध्ये येणं निव्वळ योगायोग'


जॅकलीन म्हणते 'माझं बॉलिवूडमध्ये येणं निव्वळ योगायोग'
SHARES

एकापेक्षा एक हीट चित्रपट देणारी अभिनेत्री जॅकलीन कधी काळी बॉलिवूडमध्ये यायलाच तयार नव्हती. होय खुद्द जॅकलीननेच ही माहिती दिली आहे.


काय म्हणाली जॅकलीन?

जॅकलीनने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे, 'मला लहानपणापासून कायम चांगली एन्टटेनर व्हायचं होतं. बॉलिवूडमध्ये येणं हे माझं स्वप्नच नव्हतं. मला छान छान गोष्टी ऐकायच्या होत्या. आपल्या अजूबाजूच्या लोकांना हसवायचं होतं. मी कधीच चित्रपटात काम करण्याचा विचार केला नव्हता. पण मला माहीत आहे, खरा आनंद हा एन्टटेनर होण्यामध्ये आहे. माझं बॉलिवूडमध्ये येणं निव्वळ योगायोग आहे. बॉलिवूडमध्ये केवळ मनोरंजन नाही तर नृत्य, अभिनय या दोघांचा मिळून तयार होणारे कलात्मक रूपपण आहे. आणि हजारो भावनांवर उपाय शोधण्याची क्षमता यात आहे. यामुळेच तुमचे प्रेक्षक तुमच्याबरोबर जोडले जातात.'

जॅकलिन लवकरच सलमान खान बरोबर रेस ३ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पुर्ण झालं आहे. याआधी जॅकलिनने अक्षय कुमार आणि वरूण धवन या दोन सुपरस्टार बरोबर स्क्रीन शेअर केली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा