Advertisement

'दृश्यम'मधल्या या अभिनेत्रीने केलं लग्न!

या लग्नाला बॉलिवूड सेलेब्रेटींपैकी केवळ अभिनेता मनोज वाजपेयी आणि त्याची पत्नी शबाना उपस्थित होते. हिंदू विवाह पद्धतीनुसार श्रिया आणि अॅंड्री यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नाआधी मित्रपरिवारासाठी खास पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं.

'दृश्यम'मधल्या या अभिनेत्रीने केलं लग्न!
SHARES

दृश्यम फेम अभिनेत्री श्रिया सरन प्रियकर अॅंड्री कोसचीव बरोबर लग्नबंधनात अडकली आहे. १२ मार्चला जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. श्रियाच्या मुंबईतील लोखंडवाला इथल्या घरी लग्नासाठी कुटुंबीय आणि मित्र मंडळी उपस्थित होते.



या लग्नाला बॉलिवूड सेलेब्रेटींपैकी केवळ अभिनेता मनोज वाजपेयी आणि त्याची पत्नी शबाना उपस्थित होते. हिंदू विवाह पद्धतीनुसार श्रिया आणि अॅंड्री यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नाआधी मित्रपरिवारासाठी खास पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं.


Waiting for my prince 👑 charming!

A post shared by @ shriya_saran1109 on


अॅँड्री हा रशियातील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे. डोमावकुस्नी या प्रसिद्ध रेस्टॉरंटचा तो संस्थापक आहे. याशिवाय अॅँड्री राष्टीय स्तरावरचा टेनिसपटूही आहे. त्याला २०१५ मध्ये सर्वोत्कृष्ट व्यवसायिक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तर श्रिया दाक्षिणात्य चित्रपटात एक नावजलेली अभिनेत्री आहे. श्रियाने अनेक तेलगु, तमिळ, कन्नड भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर श्रिया दृश्यम या चित्रपटात अजय देवगनबरोबर झळकली होती.



हेही वाचा

रणवीर-दीपिकाचं ब्रेकअप होणार...


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा