Advertisement

विनोदवीर राजू श्रीवास्तव यांना जीवे मारण्याची धमकी

प्रसिद्ध विनोदवीर आणि उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे प्रमुख राजू श्रीवास्तव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

विनोदवीर राजू श्रीवास्तव यांना जीवे मारण्याची धमकी
SHARES

प्रसिद्ध विनोदवीर आणि उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे प्रमुख राजू श्रीवास्तव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजू यांनाच नव्हे तर त्यांचे सल्लागार अजित सक्सेना आणि पीआरओ गर्वित नारंग यांनाही धमकीचे फोन कॉल आले आहेत.

राजू श्रीवास्तव यांना व्हॉट्स अॅप कॉलवर हा धमकीचा फोन आला होता. यात त्यांच्या पत्नी आणि मुलांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोबतच लखनौच्या कमलेश तिवारीसारखी परिस्थिती करु असंही, या अज्ञात इसमानं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी राजू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

राजू यांनी नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ते यूपीच्या माफिया आणि बेकायदा बांधकाम करणार्‍यांविरूद्ध आणि भारत पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत असल्याबद्दल बोलत आहेत. म्हणूनच त्यांना तसंच त्यांची पत्नी आणि मुलांनाही धमकावलं जात आहे.

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदवीर आहे. त्यांनी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘बिग बॉस 3′,’ स्टॅण्ड अप कॉमेडी’ अशा रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. याशिवाय अनेक चित्रपटांमध्येही ते झळकले आहेत.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा